Home शहरं पुणे pune news News : आयुक्तांना विमानतळावर अडवतात तेव्हा... - when the commissioner...

pune news News : आयुक्तांना विमानतळावर अडवतात तेव्हा… – when the commissioner is stopped at the airport …


म. टा. प्रतिनिधी, पुणे

विमानाने पुण्यात दाखल झालेले महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शान्तनु गोयल यांना महापालिकेच्या पथकातील कर्मचारी होम क्वारंटाइन होण्याची शिफारस करतात आणि त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा ‘शिक्का’ मारण्याचा आग्रह धरतात… अतिरिक्त आयुक्तांनी विमानतळावरील ‘स्क्रीनिंग’चे काम पाहण्याची जबाबदारी असलेल्या विभाग प्रमुखांशी संपर्क केल्यावर त्यांची तेथून सुटका होते… मात्र, मध्यरात्री अडीचच्या सुमारासही महापालिका कर्मचाऱ्यांचे काम पाहून अतिरिक्त आयुक्त त्यांना शाबासकीही देतात…

करोनाच्या पार्श्वभूमीवर विमानाने पुण्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांचे महापालिकेच्या पथकाकडून स्क्रीनिंग केले जाते. त्यानंतर त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारून त्यांना ठरावीक कालावधीसाठी क्वारंटाइन राहण्याचे आदेश देण्यात येतात. या प्रवाशांकडून तसे लेखी लिहूनही घेण्यात येते. यामधून अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी, अधिकारी यांना वगळण्यात आले आहे. महापालिका, विमानतळ आणि ‘सीआयएसएफ’चे कर्मचारी, अधिकारी या सूचनांचे पालन करतात.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गोयल यांना अचानक काही कामानिमित्त पुण्याबाहेर जावे लागले होते. ते बुधवारी मध्यरात्रीच्या अडीचच्या सुमारास पुणे विमानतळावर दाखल झाले. प्रवाशांची तपासणी करणे, त्यांच्याकडून लेखी लिहून घेणे आणि त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्याची महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रक्रिया सुरू होती. गोयल हे अत्यावश्यक सेवेतील अधिकारी असल्याने त्यांचे केवळ स्क्रीनिंग करणे अपेक्षित होते. मात्र, नियमाप्रमाणे उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांना होम क्वारंटाइन होण्याचा सल्ला देऊन त्यांच्या हातावर शिक्का मारणे आवश्यक असल्याचे सांगितले.

गोयल यांनी आपण महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त असून आपणास या प्रक्रियेतून जाण्याची आवश्यकता नाही. तसेच, करोनाच्या पार्श्वभूमीवर मला लगेचच सेवेत रुजू होणे आवश्यक असल्याचे त्यांना सांगितले. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांना ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगण्याची विनंती केली. तसेच, ‘आमच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला सोडण्यास सांगितले तर त्याप्रमाणे कार्यवाही करू’ अशी विनंती केली. त्यामुळे गोयल यांनी अखेरीस या विभागाची जबाबदारी पाहणारे उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांना मध्यरात्री अडीचच्या सुमारास फोन केला. त्यानंतर घोरपडे यांनी विमानतळावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना तशा सूचना दिल्या आणि त्यानंतर अतिरिक्त आयुक्त आपल्या घरी पोहोचले. गोयल यांनी जाण्यापूर्वी तेथे कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही आवर्जून मारली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

cm uddhav thackeray: मुख्यमंत्र्यांच्या हाती ‘व्हिजन’पत्र – nashik shivsena party workers meet cm uddhav thackeray for godavari beautification project

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर नाशिक विकासाचे व्हिजन सादर करीत यासाठी निधीसह राज्य सरकारच्या...

Prakash Ambedkar: काँग्रेस, डाव्यांना लकवा मारला का ? – vanchit baujan aghadi president prakash ambedkar has criticized congress and leftists over farmers protest

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाददिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठबळ देण्यात काँग्रेस, डावे पक्ष पूर्णत: अपयशी ठरले आहेत. आंदोलनात न उतरण्यासाठी या पक्षांना लकवा मारला आहे...

Recent Comments