Home शहरं पुणे pune news News : ‘आरटीआय’ अपीलांचीदूरस्थ सुनावणी घ्या - take a remote...

pune news News : ‘आरटीआय’ अपीलांचीदूरस्थ सुनावणी घ्या – take a remote hearing of rti appeals


म. टा. प्रतिनिधी, पुणे

करोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर राज्य माहिती आयोगाच्या अमरावती खंडपीठाने पुढाकार घेऊन माहिती अधिकार अर्जावरील प्रलंबित अपीले, तक्रारींवर दूरस्थ सुनावणी (डिस्टन्स हीअरिंग) घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी खंडपीठातर्फे सार्वजनिक प्राधिकरणांना ई-मेलवर नोटीस पाठविण्यात येत आहे; तसेच सुनावणीदरम्यान दूरध्वनी, व्हॉट्सअॅपवरून कॉल करून बाजू ऐकून घेतली जात आहे. या पुढाकाराचे माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून, राज्य माहिती आयोगानेही प्रलंबित अपीले आणि तक्रारी निकालात काढण्यासाठी अमरावती खंडपीठाच्या धर्तीवर दूरस्थ सुनावण्या घेण्याची मागणी केली आहे.

करोना संकट आणि संचारबंदीच्या घोषणेनंतर राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठातील कामकाजही थंडावले आहे. आयोगाकडे दर महिन्याला हजारो माहिती अधिकार अर्जांवरील द्वितीय अपीले आणि तक्रारी दाखल होतात. मात्र, पोस्टाचे व्यवहारही बंद असल्याने गेल्या दोन महिन्यांत अपीले आणि तक्रारींचा ओघ आटला आहे. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्या ३३ टक्के मर्यादित उपस्थितीसह आयोगाची कार्यालये सुरू झाली असली, तरी दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्याने नागरिकांना प्रत्यक्ष आयोगाच्या कार्यालयात जाणे दुरापास्त झाले आहे.

त्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या अमरावती खंडपीठाचे पूर्णवेळ आणि नागपूर खंडपीठाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे माहिती आयुक्त संभाजी सरकुंडे यांनी अपिलांवर दूरस्थ सुनावणी घेण्याच्या दृष्टीने खंडपीठाच्या दैनंदिन कामकाजात काही बदल केले आहेत. त्याचा भाग म्हणून, अपील करणाऱ्या व तक्रारदारांच्या अर्जानुसार संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाला त्यांच्या कार्यालयीन ई-मेल आयडीवर नोटीस पाठवून त्यावर खुलासे मागवून घेण्यात येत आहेत. त्याचबरोबर अपील करणाऱ्यांना, तक्रारदारांनाही ई-मेलवर नोटीस पाठवून, गरजेनुसार दूरस्थ सुनावणीचा भाग म्हणून त्यांना मोबाइलवर, व्हॉट्सअॅपवर कॉल करून, त्यांची बाजू ऐकून घेतली जात आहे. याशिवाय नागरिकांनी आयोगाच्या ई-मेल आयडीवर कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह २० रुपयांचा स्टॅम्प लावून अर्ज केल्यास तत्काळ सुनावणीची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आयोगाच्या कार्यालयात व्यक्तिशः येणे शक्य नसल्यानेच अप्रत्यक्षपणे अंतरावरून आयोगाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार, गेल्या तीन वर्षांत आयोगाकडे प्राप्त झालेल्या ८ हजार द्वितीय अपिलांवर आणि एक हजार तक्रार अर्जांवर सुनावण्या घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे, असे माहिती आयुक्त संभाजी सरकुंडे यांनी सांगितले.

……

राज्य माहिती आयोगाच्या अमरावती खंडपीठाच्या माहिती आयुक्तांनी प्रलंबित अपीलांवर दूरस्थ सुनावण्या घेण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य माहिती आयोगाने सुरक्षित वेब व्यासपीठाचा वापर करून दूरस्थ सुनावण्या घेतल्या पाहिजेत. त्यासाठी अपील करणारे आणि जन माहिती अधिकाऱ्यांना वेळ आणि पैसा खर्चून आयोगापुढे प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही. आजकाल शालेय विद्यार्थीही व्हॉट्सअॅप वापरतात. मग राज्य माहिती आयोगालाच अडचण काय?

– शैलेश गांधी, माजी माहिती आयुक्त, केंद्रीय माहिती आयोग

..

सॉफ्टवेअरचीही चाचपणी

अमरावती खंडपीठातर्फे दूरस्थ सुनावण्यांसाठी सॉफ्टवेअरचीही चाचपणी केली जात आहे. त्याद्वारे अर्जदारांना एसएमएसद्वारे अलर्ट पाठविणे, संबंधित प्राधिकरणांना पंधरा दिवसांपूर्वी नोटीस पाठविणे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा ऑडिओ कॉलद्वारे सुनावणी घेणे, ई-मेलद्वारे आदेश पाठविणे, आदेश आणि मासिक व वार्षिक अहवाल आपोआप संकेतस्थळावर अपलोड करणे शक्य होणार आहे, असेही संभाजी सरकुंडे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sharad pawar on madhukar pichad: Sharad Pawar: गेल्या निवडणुकीत काहींच्या अंगात आलं होतं!; पवारांनी ‘या’ नेत्याची काढली पिसं – the behavior of some of...

नगर: ‘मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी काही नेत्यांच्या अंगात आले होते. त्यामुळे ते चमत्कारिक वागले. ज्यांना पक्षाने भरभरून दिले, त्यांनीच ऐनवेळी साथ सोडली. मात्र, शेवटी...

Recent Comments