Home शहरं पुणे pune news News : करोनाकाळात अनावश्यक कामांना कात्री - scissors for unnecessary...

pune news News : करोनाकाळात अनावश्यक कामांना कात्री – scissors for unnecessary work in the coronal period


पुणे : कोव्हिड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी चालू आर्थिक वर्षात सर्व अनावश्यक कामांना कात्री लावून फक्त अत्यावश्यक कामेच केली जाणार असल्याचे महापालिकेने निश्चित केले आहे. महापालिका आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांकडून अत्यावश्यक कामांची यादी मागितली असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी सहा सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. पालिकेचे हक्काचे मिळकतकराचे उत्पन्न घटले असून, राज्य सरकारकडून मिळणारा जीएसटीचा पूर्ण हिस्सा पालिकेला प्राप्त झालेला नाही. राज्य सरकारने सर्व महापालिकांना नव्या प्रकल्पांवर खर्च करू नये, नव्याने कोणतीही खरेदी केली जाऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर, अर्थसंकल्पाचा आढावा घेऊन आवश्यक कामांची यादी तयार करून त्यानुसार कार्यवाही करण्यासाठी आयुक्त शेखर गायकवाड यांनी सहा सदस्यीय समितीची रचना केली आहे. या समितीमध्ये आयुक्तांसह संबंधित विभागाचे काम पाहणारे अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, भांडार विभागाचे उपायुक्त आणि संबंधित विभागाचे प्रमुख यांचा समावेश असेल. या समितीसमोर महत्त्वाच्या कामांचे प्रस्ताव सादर करण्यात येणार असून सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीनंतर आयुक्तांच्या अंतिम स्वाक्षरीनंतर संबंधित कामाला गती देण्यात येणार आहे. या समितीमध्ये एखाद्या भांडवली अथवा अर्थसंकल्पातील इतर कामांना मान्यता देण्यात आली नाही, तर हे काम करता येणार नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments