Home शहरं पुणे pune news News : ‘करोना हारेगा, देश जीतेगा’ - 'karona will lose,...

pune news News : ‘करोना हारेगा, देश जीतेगा’ – ‘karona will lose, country will win’


म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘एरवी सीमेवर आम्ही शत्रूशी लढतो. मात्र, सध्या करोना नावाचा शत्रू देशातच धुमाकूळ घालत आहे. प्राणाची बाजी लावून तुम्हीच त्याला थोपवत आहात. आमचा तुम्हाला कडक सॅल्यूट…’ अशा शब्दांत सर्वांकडून सॅल्यूट स्वीकारणाऱ्या लष्करी वर्दीने रविवारी सकाळी पुण्यातील स्वच्छता कर्मचारी, आरोग्यसेवक, पालिका प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सॅल्यूट केला आणि पालिकेच्या प्रांगणात भारतमातेचा जयजयकार घुमला. ‘करोना हारेगा, देश जीतेगा,’ ही घोषणा करोनायोद्ध्यांचे बळ वाढवणारी ठरली.

संरक्षण मंत्रालयाच्या सूचनांनुसार भारतीय लष्कराने पुणे महापालिकेच्या करोना योद्ध्यांचा रविवारी सन्मान केला. लष्कराच्या पुणे स्टेशनचे प्रमुख ब्रिगेडिअर कुलजित सिंह यांनी या योद्ध्यांचा सन्मान केला. महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल, विविध सहायक आयुक्त, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर लष्करी अधिकारी व करोनायोद्ध्यांनी एकत्र केक कापून हा क्षण साजरा केला. सुरुवातीला करोनामुळे बळी गेलेले पालिकेचे दोन स्वच्छता कर्मचारी व पुणेकर नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

‘करोना हे मोठे संकट आहे; पण तुम्ही सर्व जण त्याविरोधात सक्षमपणे लढत आहात. आम्हाला तुमचा अभिमान आहे,’ असे कुलजित सिंह म्हणाले. ‘सीमेवर अहोरात्र देशाचे रक्षण करणाऱ्या लष्करामुळेच देश सुरक्षित आहे. करोना विरोधातील लढाई निश्चितच सोपी नाही, पालिकेचे दोन हजार योद्धे दररोज अथक परिश्रम घेत आहेत,’ असे महापौर मोहोळ म्हणाले. शेखर गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nanded govt officers horse latest news: ‘या’ अधिकाऱ्याला घोड्यावरून ऑफिसला यायचंय!; विनंती पत्र झालं व्हायरल – official seeks nod to tie horse on campus...

हायलाइट्स:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याचं पत्र चर्चेत.कार्यालयाच्या आवारात घोडा बांधण्यासाठी मागितली परवानगी.अजब पत्राने जिल्हाधिकारी विपिन इटनकर पडले बुचकळ्यातनांदेड:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना विभागात...

PM Modi: पेट्रोल पंपांवरील PM मोदींचे फोटो असलेले होर्डिंग हटवा, निवडणूक आयोगाचे निर्देश – west bengal election 2021 election commission ordesr petrol pumps to...

कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका ( west bengal election 2021 ) होत आहेत. राज्यात आचरसंहिता लागू आहे. आता निवडणूक आयोगाने ( election commission...

Recent Comments