Home शहरं पुणे pune news News : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे हटवण्याची...

pune news News : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे हटवण्याची विनंती – request to remove offenses against activists


म. टा. प्रतिनिधी, पुणे

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकालात दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणात भाजपचे कार्यकर्ते, नगरसेवक यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात आले. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवरील गुन्हे तसेच ठेवण्यात आले आहेत. राज्यात सत्ता बदलल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या, अशी विनंती आमदार सुनील टिंगरे; तसेच काँग्रेसचे नगसेवक अरविंद शिंदे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

देशमुख नुकतेच पुण्यात आले असताना, टिंगरे आणि शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणात सर्वपक्षीय नगरसेवक, कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. फडणवीस गृहमंत्री असताना भाजपच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात आले असल्याचा दावा टिंगरे आणि शिंदे यांनी केला. त्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात आले नाहीत. राज्यात सत्ताबदल झाला असून, महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. त्यामुळे या प्रकरणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, कार्यकर्ते यांच्यावरील गुन्हेही मागे घेण्यात यावेत, अशी विनंती टिंगरे आणि शिंदे यांनी केली आहे.

फडणवीस सरकारने ज्या आधारे भाजप कार्यकर्ते, नगरसेवक यांची या गुन्ह्यातून सुटका केली, त्याच प्रकारे विद्यमान सरकारनेही काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी विनंती गृहमंत्र्यांना केली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आमदार टिंगरे यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

online education of divyang: ऑनलाइन शिक्षणासाठी दिव्यांगांना मोबाइल देणे शक्य नाही; सरकारची भूमिका – not possible to provide mobile for online education of divyang,...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'राज्यभरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना करोना काळात ऑनलाइन शिक्षण घेता यावे यासाठी एक वेळचा उपाय म्हणून मोबाईल हँडसेट द्यायचे ठरल्यास त्याचा...

pubg mobile global championship 2020: उद्यापासून पबजी चॅम्पियनशीप, १६ टीमचा सहभाग, ८.७८ कोटीचे बक्षीस – view complete details of pubg mobile global championship 2020,...

नवी दिल्लीःPUBG Mobile Global Championship 2020 उद्यापासून सुरू होणार आहे. भारतात पबजीला बंदी असली तरी पबजी लाँचिंगची चाहत्यांना फार उत्सूकता आहे. लवकरच रिलाँच...

Recent Comments