Home शहरं पुणे pune news News : खासगी रुग्णालयांवर कारवाई का नाही? - why not...

pune news News : खासगी रुग्णालयांवर कारवाई का नाही? – why not take action against private hospitals?


म. टा. प्रतिनिधी, पुणे

करोनाबाधितांकडून खासगी हॉस्पिटल भरमसाठ पैसे वसूल करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत काय कारवाई केली, असा प्रश्न विचारून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या तक्रारींकडे गांभीर्याने पाहत नाही का, असा प्रश्न बैठकीस उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधींसह उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना केला. करोनासारखी गंभीर परिस्थिती हाताळताना वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची टिप्पणी करीत त्यांनी नाराजीही व्यक्त केली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत पवार यांनी खासगी हॉस्पिटलांबाबत असलेल्या तक्रारींकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. या वेळी पालकमंत्री अजित पवार यांनी अशा हॉस्पिटलांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची सूचना महापालिका आयुक्तांना करून वेळ मारून नेली, तर अशा प्रकरणांत दोषी असलेल्यांना धडा शिकविण्याचे आदेशही पवार यांनी पोलिस आयुक्तांना दिले.

पवार यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांची आढावा घेणारी पुण्यात पहिलीच बैठक घेतली. महापालिका, पोलिस आणि जिल्हा प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दररोज एकमेकांशी बोलले पाहिजे. उपाययोजनांतील त्रुटी काढून समन्वय वाढविला पाहिजे, असा ज्येष्ठत्वाचा सल्लाही पवार यांनी दिला. प्रशासनाने सातत्याने लोकप्रतिनिधींना सद्यस्थितीबाबत अवगत करणेही आवश्यक असल्याची सूचना या वेळी केली.

लोकप्रतिनिधींनी आपल्या सूचना सांगताना खासगी हॉस्पिटलमध्ये बेड न मिळणे, उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. या बैठकीपूर्वीही हेच मुद्दे उपस्थित झाल्याचे सांगून, पवार यांनी याबाबत काही धोरण केले आहे का, अशी विचारणा प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली. बैठका घेतल्या असतील, तर परिस्थिती का बदलली नाही, अशी थेट विचारणाही केली.

कारवाई करण्याची सूचना

शरद पवार यांनी खासगी हॉस्पिटलच्या मनमानीबाबत प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर अजित पवार यांनी स्वत:च थेट खुलासा केला. याबाबत पाच बैठका घेतल्या असून, त्यात हॉस्पिटलविरोधातील तक्रारींची चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांना दिल्या. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत या सूचना दिल्याने त्यांच्या कामगिराचा आढावाही या वेळी अप्रत्यक्षपणे घेण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली होती.

अधिकाऱ्यांची कानउघाडणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत शरद पवार यांच्यासमोर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कामाचे कौतुक केले. पुणे महापालिकेने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आर्थिक भार सहन केला असल्याने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र, अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. ‘करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन काम केले पाहिजे,’ असे अजित पवार म्हणाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

R. Ashwin: टीम इंडियामध्ये लागलं मोठं चॅलेंज, पुजाराने ‘ही’ गोष्ट केल्यावर अश्विन अर्धी मिशी ठेवणार – ind vs eng : indian cricketer r. ashwin...

नवी दिल्ली, IND vs ENG : भारतीय संघामध्ये सध्याच्या घडीला एक मोठं चॅलेंज लागलेलं आहे. हे चॅलेंज भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने भरवश्याचा फलंदाज...

farmers protest Delhi: farmers protest delhi : दिल्लीत शेतकरी आंदोलनात हिंसाचार; अभिनेता दीप सिद्धू चर्चेत – farmers protest delhi yogendra yadav and gurnam singh...

नवी दिल्लीः दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारामागे ( violence in farmers protest ) पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू ( deep sidhu...

Recent Comments