Home शहरं पुणे pune news News : जन्म-मृत्यू नोंदीक्षेत्रीय स्तरावर - birth and death records...

pune news News : जन्म-मृत्यू नोंदीक्षेत्रीय स्तरावर – birth and death records at the regional level


पुणे : लॉकडाउनच्या काळात महापालिकेला मर्यादित मनुष्यबळावरच काम करावे लागत असल्याने जन्म-मृत्यू दाखले मिळण्यासाठी होणारा विलंब लक्षात घेता १६ जूनपासून क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर त्याचे काम सुरू करण्याचे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत. त्यासाठी पुढील तीन-चार दिवसांत आवश्यक यंत्रणा निर्माण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

राज्य सरकारच्या सूचनांनुसार ठरावीक सेवकवर्गावरच कार्यालयातील काम सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचा सर्वाधिक परिणाम जन्म-मृत्यू कार्यालयावर झाला होता. अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेक दाखल्यांचे काम प्रलंबित होते. त्याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत असल्याने महापौरांनी पुढाकार घेऊन गुरुवारी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आरोग्य विभागातर्फे येत्या १६ जूनपासून एक आरोग्य अधिकारी क्षेत्रीय कार्यालयासाठी उपलब्ध करून दिला जाणार आअसून, सर्व नोंदीचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कम्प्युटर, इतर प्रणाली आणि ऑपरेटर उपलब्ध करून दिला जाणार आहे. स्थानिक स्तरावर हे काम सुरू झाल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहायक आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळिवंत यांच्यासह पालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments