Home शहरं पुणे pune news News : जुन्नर तालुक्यात करोनाचा शिरकाव; - corona infiltration in...

pune news News : जुन्नर तालुक्यात करोनाचा शिरकाव; – corona infiltration in junnar taluka;


म. टा. वृत्तसेवा, जुन्नर

करोनाने जुन्नर तालुक्यात शिरकाव केला असून, पहिल्याच दिवशी तालुक्यात करोनाचे पाच रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. धोलवड येथे मुंबईहून आलेल्या कुटुंबातील दोन महिलांसह एका ज्येष्ठ नागरिकाला करोनाची लागण झाली आहे. यांसह सावरगाव येथील एका दाम्पत्याचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आला आहे.

‘सुरक्षेच्या कारणास्तव धोलवड आणि सावरगावच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे,’ अशी माहिती ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली.

‘धोलवडच्या जांभळपट्यातील एकाच कुटुंबातील चार जणांना करोनाची लक्षणे दिसत असल्याने उपचारासाठी चार दिवसांपूर्वी त्यांना पुणे येथे पाठविले होते. यातील दोन महिलांचे अहवाल शनिवारी रात्री (२३ मे) पॉझिटिव्ह आले. इतर दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून धोलवड ग्रामपंचायत परिसर व गावपातळीवर सात दिवस पूर्ण संचारबंदी करण्यात आली आहे. गावात येणारे सर्व रस्ते व सीमा बंद करण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती सरपंच मंगल नलावडे, उपसरपंच सोमनाथ नलावडे यांनी दिली.

.

मावळात रुग्ण वाढले

लोणावळा : मावळात सलग सहाव्या दिवशी करोनाचा रुग्ण आढळला. टाकवे बुद्रुक जवळील घोणशेत येथे १७ मे रोजी गोवंडी, मुंबई येथून मूळ गावी आलेल्या एका ४० वर्षीय व्यक्तीला रविवारी करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या जवळच्या संपर्कातील नऊ जणांच्या ‘स्वॅब’ तपासणीसाठी पुण्यात पाठविण्यात आले आहेत. चांदखेडमध्ये आढळलेल्या करोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबातील रुग्णाच्या आई व पत्नीचाही करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

निवडणुकीचे मानधन न मिळाल्यानं शिक्षक संतापले – teachers from niphad did not get paymet of work in gram panchayat election

म. टा. वृत्तसेवा, निफाडतालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली, गावोगावचे कारभारी निवडले गेले, गुलाल उधळला गेला. मात्र या निवडणुकीच्या प्रशासकीय कामकाजासाठी झटणाऱ्या...

Rishabh Pant: ICC क्रमवारीत ऋषभ पंतने सर्वांना मागे टाकले; विराट कोहली चौथ्या क्रमांकावर घसरला – icc test ranking rishabh pant is the best wicket-keeper...

दुबई: icc test ranking ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत नाबाद ८९ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून देणाऱ्या ऋषभ पंत (rishabh pant)ला एक मोठे बक्षिस...

Recent Comments