Home शहरं पुणे pune news News: डॉक्टर आणि पोलिस खरे हिरो - doctor and police...

pune news News: डॉक्टर आणि पोलिस खरे हिरो – doctor and police true hero


म. टा. प्रतिनिधी, हडपसर

‘डॉक्टर आणि पोलिस हे खरे हिरो आहेत. मनापासून त्यांना मानाचा मुजरा. सीमेवर उभे राहून ज्याप्रमाणे जवान लढतात, त्याप्रमाणे डॉक्टर आणि पोलिस रस्त्यावर थांबून लढा देत आहेत. करोनाचा शत्रू उंबरठ्याच्या बाहेर आहे. त्याला खांद्यावर घेऊन घरामध्ये आणू नका. ही लढाई प्रत्येक नागरिकांसाठी आहे. सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन सर्वांनी केले पाहिजे,’ असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

खासदार डॉ. कोल्हे यांच्या जगदंबा प्रतिष्ठान, नोबेल हॉस्पिटल व हडपसर विधानसभा मतदार संघाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची तपासणी करण्यात आली. या प्रसंगी आमदार चेतन तुपे, नोबेल हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापक डॉ. दिलीप माने, डॉ. एच. के. साळे, पुणे शहर पोलिस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलिस आयुक्त कल्याण विधाते, हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे, जिल्हा नियोजन सदस्य अमोल हरपळे, मंगेश वाघ, डॉ. शंतनू जगदाळे आदी उपस्थित होते. हे शिबिर फिरते असून, याचा अनेकांना लाभ होत आहे.

या वेळी गाडीतळ चौक, १५ नंबर, भेकराई चौक, मंतरवाडी चौक, हडपसर गाव, गांधी चौक या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या ५० पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

करोनाला हरवायचे असल्यास प्रत्येकाने घरी बसून सरकारला मदत करावी. हडपसर भागात सेंट्रल किचनद्वारे रोज १० हजार नागरिकांना जेवण देण्यासाठी नियोजन करीत आहोत. यासाठी नगरसेवकांच्या फंडामधून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. ही मागणी पवार यांनी मान्य केल्याने हडपसर भागातील नागरिकांच्या जेवणाची सोय करण्यात येत आहे.

– चेतन तुपे, आमदार

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments