Home शहरं पुणे pune news News : ‘तुझ्यात जीव रंगला’ पासून चित्रीकरणाचा श्रीगणेशा - tuzhat...

pune news News : ‘तुझ्यात जीव रंगला’ पासून चित्रीकरणाचा श्रीगणेशा – tuzhat jeev rangala marathi tv drama shooting start next week


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लॉकडाउनमुळे पॅकअप केलेल्या चित्रीकरणाला पुन्हा एकदा पुढील आठवड्यात सुरुवात होत आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या टीव्ही मालिकेच्या माध्यमातून चित्रीकरणाचा श्रीगणेशा होणार आहे.

येत्या २२ जूनपासून कोल्हापुरात चित्रीकरण सुरू होणार असून, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचे कलाकार, तंत्रज्ञ तेरा दिवसांपूर्वीच कोल्हापुरात दाखल झाले आहेत. आल्यानंतर त्यांचे स्वॅब घेण्यात आले असून, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर त्यांना १४ दिवस संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. दोन दिवसानंतर मुदत संपताच चित्रीकरण सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये राणा अर्थात हार्दिक जोशी व पाठकबाई अर्थात अक्षया देवधर यांच्यासह इतर प्रमुख कलाकार कोल्हापुरात आले आहेत. सुरक्षित वावराचे सर्व नियम पाळून चित्रीकरण करण्यात येणार आहे. यामुळे आठ ते दहा दिवसानंतर या मालिकेचा नवा भाग पहायला मिळण्याची शक्यता आहे.

‘सुरक्षित वावराचे नियम पाळतानाच ६० लोकांचे युनिट ४० पर्यंत कमी करण्यात आले आहे. करवीर तालुक्यातील केर्ली गावात हे चित्रीकरण करण्यात येणार आहे. याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे,’ असे प्रॉडक्शन हेड रवी गावडे यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

PM Modi: PM मोदींचा जागतिक पुरस्काराने सन्मान; म्हणाले, ‘भारतीय जनतेला…’ – pm modi conferred with the ‘global energy and environment leadership award’

नवी दिल्लीः ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचे अनेक आघाड्यांवरील अभियानन आणि जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पंतप्रधान मोदी यांना शुक्रवारी सेरावीक ग्लोबल एनर्जी...

Recent Comments