Home शहरं पुणे pune news News : दिवसभरात २७१ जण घरी - 271 people at...

pune news News : दिवसभरात २७१ जण घरी – 271 people at home during the day


पुणे : पुणे शहर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढण्याची चिंता कायम असली, तरी दुसरीकडे पुण्यात बरे झालेल्यांची संख्याही वाढत आहे. पुणे शहरात दिवसभरात २७१ रुग्ण डिस्चार्ज झाल्याने आतापर्यंतच्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५ हजार ५७५ पर्यंत गेली असून, ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. शहरात सात जणांचा मृत्यू झाल्याने मृत्युमुखींची संख्या घटल्याचे दिसते, तर शहर जिल्ह्यात ४३५ जणांना लागण

झाली आहे.पुणे शहरात एका दिवसात ३०५ जणांना लागण झाली, तर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या बुधवारी वाढली असून, प्रथमच १०३पर्यंत पोहोचली. पुणे कँटोन्मेंटमध्ये २०, तर पुणे ग्रामीणमध्ये ७ रुग्ण सापडले आहेत. बुधवारी दिवसभरात ४३५ जणांना संसर्ग झाल्याने एकूण रुग्णसंख्या १० हजार ३९४

झाली आहे.पुण्यात एका दिवसात २७१ जणांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले आहे. गंभीर झालेल्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. २१४ रुग्ण गंभीर असून, ४३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुणे शहरातील रुग्णालयांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात तीन जण पुण्यातील असून, दोन बाहेरचे आहेत. त्यात एक भुसावळमधील, तर दसुरा पुरंदर तालुक्यातील गुऱ्होळी येथील आहे. मृतांची संख्या ४५७ पर्यंत पोहोचली आहे. पुणे महापालिकेच्या आकडेवारीनुसार, पुण्यात मृतांच्या संख्येने ४००चा आकडा ओलांडला आहे. पुण्यात आतापर्यंत उपचाराखालील रुग्णांची संख्या २ हजार ५२८ एवढी आहे.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

CSK vs RR: IPL 2020: जडेजाची धडाकेबाज फलंदाजी, चेन्नईचे राजस्थानपुढे सन्मानजनक आव्हान – ipl 2020: chennai super kings given 126 runs target to rajasthan...

अबुधाबी, IPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या फलंदजांना यावेळी चांगला सूर गवसल्याचे पाहायला मिळाले नाही. याला फक्त अपवाद ठरला तो अष्टपैलू रवींद्र...

ssc-hsc re-exams 2020: दहावी, बारावीची फेरपरीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये – ssc-hsc re-exams 2020 to be conducted in november december month, application process started

SSC-HSC Re-Exams 2020: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी आणि बारावीची फेरपरीक्षा यंदा कोविड-१९ संक्रमण स्थिती आणि त्यामुळे पुकारलेल्या...

flowers change colour: फुलं बदलताहेत आपले रंग – flowers change colour

तापमान वाढीमुळे जगाचे पर्यावरण ज्या पद्धतीने बदलत चालले आहे त्याच्याशी सृष्टीतील प्राणी तसेच वनस्पती स्वत:ला जोडून घेऊ लागले आहेत. वाढते तापमान आणि घटते...

Recent Comments