Home शहरं पुणे pune news News : नगरसेवकांच्या तक्रारी दाखल - complaints of corporators filed

pune news News : नगरसेवकांच्या तक्रारी दाखल – complaints of corporators filed


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘तू खूप पैसे कमावले आहेस. त्यामुळे एक कोटी रुपये दे,’ अशी मागणी करीत कलाटे बंधूंनी मारहाण केल्याचे भाजप नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीनंतर अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

भाजपचे नगरसेवक व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांना मारहाणप्रकरणी मंगळवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांची भेट घेऊन, ‘गुंड नगरसेवकांवर कारवाई करा,’ अशी मागणी केली होती. त्यानंतर रात्री उशिरा या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी दवाखान्यात जाऊन मडिगेरी यांचे म्हणणे नोंदवून घेतले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनंतर शिवसेना नगरसेवक राहुल कलाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे आणि विलास मडिगेरी यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. मडिगेरी यांनी राहुल कलाटे आणि मयूर कलाटे यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे, तर राहुल कलाटे आणि मयूर कलाटे यांनी मडिगेरींविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, य़ा घटनेनंतर मडिगेरी यांनी तक्रार दिली नव्हती; परंतु पोलिसांनी गुंड नगरसेवकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे आणि सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन मारहाणप्रकरणी संबंधित नगरसेवकांवर कारवाईची मागणी केली.

‘राज्यात सत्तेत आल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची गुंडगिरी वाढली आहे. सोमवारी दोन्ही पक्षांच्या गुंड नगरसेवकांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इमारतीत भाजपचे नगरसेवक व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांना मारहाण केली आहे. त्यामुळे या गुंड नगरसेवकांवर कडक कारवाई करावी,’ अशा मागणीचे निवेदनही त्यांनी पोलिस आयुक्तांना दिले.

तेव्हा तक्रारच दाखल नव्हती

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेण्यात तत्परता दाखवली असली, तरी मडिगेरी यांनी राहुल कलाटे, मयूर कलाटे यांच्याविरोधात अद्याप कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. त्यामुळे तक्रार दाखल नसताना, कारवाई करण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी चांगलीच चर्चेत आली होती. त्यामुळे अखेर पोलिसांनीच दवाखान्यात जाऊन मडिगेरी यांचे म्हणणे नोंदवून घेऊन अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

मडिगेरींना संरक्षण देण्याची मागणी

भाजपचे पिंपरी-चिंचवड शहरातील नेते धूर्त आणि कपटी आहेत. मडिगेरी मारहाण प्रकरण बनाव आहे. कलाटे बंधूंची राजकीय कारकीर्द उध्वस्त करण्याचे हे षडयंत्र आहे. भाजपच्या षडयंत्रातून मडिगेरी यांनाच धोका आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना नगरसेवकांनी पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे केली आहे. भाजप दबाव आणून मडिगेरी यांचा ‘रिपोर्ट’ हवा तसा बनवून घेऊ शकतात. मडिगेरी यांच्याबाबत ते रुग्णालयात काही अनपेक्षित कट घडवून आणू शकतात. त्यामुळे मडिगेरी यांना पोलिस संरक्षण देण्याची गरज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षनेते नाना काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक राजू मिसाळ, दत्ता साने, तर शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांनी बिष्णोई यांची भेट घेतली.

मडिगेरी आणि ते ज्यांच्या सांगण्यावरून काम करतात, त्या आमदारांसह माझीही ‘नार्को टेस्ट’ करावी. त्यातून महापालिकेच्या माध्यमातून कोणी, किती पैसे कमावले आणि त्या दिवशी काय झाले, हे स्पष्ट होईल.

– राहुल कलाटे, नगरसेवक, शिवसेनाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Thane: Thane: कामाचे पैसे न दिल्याने प्लंबरने केली कंत्राटदाराची हत्या – man killed contractor at ghodbunder in thane

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : कामाचे १२ हजार रुपये न दिल्याने प्लंबरने कंत्राटदाराची हत्या केल्याची घटना ठाण्यातील घोडबंदर भागात घडली. हत्येनंतर परराज्यात पळून...

Donald Trumps Filthyair Comment On India, Howdy Modi Trending On Twitter – डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरच्या टिप्पणीनंतर #HowdyModi चा ट्रेन्ड

नवी दिल्ली : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान वारंवार भारताचाही उल्लेख होतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र म्हणवणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल...

Sharad Pawar: खडसेंना काय मिळणार? पवारांच्या ‘या’ वक्तव्यामुळं सस्पेन्स वाढला! – There Will Be No Change In Maharashtra Cabinet, Says Ncp Chief Sharad Pawar

मुंबई: 'एकनाथ खडसे यांच्या प्रवेशामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्याही मंत्र्याचं पद जाणार नाही. मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही. जे जिथे काम करत आहेत, ते...

Recent Comments