Home शहरं पुणे pune news News : नवीन प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर - new restricted areas...

pune news News : नवीन प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर – new restricted areas announced


म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यातील नवीन प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केली असून बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक प्रतिबंधित क्षेत्र टाकण्यात आली आहेत. तर, शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील यापूर्वीची प्रतिबंधित क्षेत्र बऱ्यापैकी कमी झाली आहेत. शहराच्या सर्वच्या सर्व क्षेत्रीय कार्यलयांच्या हद्दीत पहिल्यांदाच प्रतिबंधित क्षेत्र टाकण्यात आल्याने करोनाचा विळखा संपूर्ण शहराला पडल्याचे चित्र दिसते आहे.

महापालिका आयुक्तांनी गेल्या वेळी आदेशांमध्ये औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत प्रतिबंधित क्षेत्र नव्हते. मात्र, बोपोडी तसेच इतर भागात वाढलेले रुग्ण पाहता या ठिकाणीही प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वीच्या आदेशांनुसार जनता वसाहत ही संपूर्णपणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले होते. नवीन आदेशांमध्ये तेथील रस्ता खुला करण्यात आला आहे. कसबा-विश्रामबागवाडा, भवानी पेठ; तसेच ढोले पाटील रस्ता या मध्यवस्तीतील प्रतिबंधित क्षेत्र कायम ठेवण्यात आली आहेत.

यापुढील काळात नागरिकांना करोना विषाणूचा सामना करीतच दैनंदिन व्यवहार करण्याची जीवनपद्धती अवलंबवावी लागणार आहे. रुग्ण वाढल्यास संबंधित भौगोलिक क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येते. प्रतिबंधित क्षेत्राला मिळणाऱ्या सवलती इतर क्षेत्रांपेक्षा अत्यंत कमी असल्याने येथील नागरिकांना कठोर नियमांचा सामना करावा लागणार आहे. नागरिकांनी यापुढील काळात मास्क वापरणे, हात सातत्याने स्वच्छ धुणे, समोरील व्यक्तींपासून सुरक्षित अंतर राखून काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

…………..

B३ मे २०२० रोजी देण्यात आलेले आदेश B

पुणे महापालिकेचे एकूण क्षेत्रफळ ३३० चौरस किमी

एकूण प्रतिबंधित क्षेत्र : ६९

एकूण भौगौलिक क्षेत्र : ९.९१ चौरस किमी

B१९ मे २०२० रोजी देण्यात आलेले आदेश

Bएकूण प्रतिबंधित क्षेत्र : ६५

एकूण भौगौलिक क्षेत्र : १०.४८ चौरस किमी

B२ जून रोजी देण्यात आलेले आदेश

Bएकूण प्रतिबंधित क्षेत्र : ६६

एकूण भौगौलिक क्षेत्र : ९.२८ चौरस किमी

……….

Bअशी आहेत निरीक्षणे

B- औंधमध्ये पहिल्यांदा दोन प्रतिबंधित क्षेत्र.

– सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत प्रतिबंधित क्षेत्र निर्माण झाले आहेत.

– बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सर्वाधित प्रतिबंधित क्षेत्रे निर्माण झाली आहेत.

– पाटील इस्टेट आणि शिवाजीनगर परिसरातील झोपडपट्ट्यांमधील करोनाबाधितांची संख्या घटली.

– ताडीवाला रस्ता येथील प्रायव्हेट रस्ता झोपडपट्टीचा भाग खुला झाला.

– पाटकर प्लॉट, पाटील इस्टेटसमोरचा भाग खुला झाला.

………Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jameel shaikh murder: Jameel Shaikh Murder: जमील शेख हत्या: शूटर्सना ‘त्याने’ कारमधून मालेगावात सोडले आणि… – jameel shaikh death shooters went to malegaon in...

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी शाहिद लायक शेख (३१) या आरोपीला...

Recent Comments