Home शहरं पुणे pune news News : पर्यटन व्यावसायिकाची १३ लाखांची फसवणूक - 13 lakh...

pune news News : पर्यटन व्यावसायिकाची १३ लाखांची फसवणूक – 13 lakh fraud of tourism professionals


म. टा. प्रतिनिधी, पुणे

पर्यटन व्यावसायिकाला १३ लाख ३९ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी अज्ञात मोबाइलधारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका ३४ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारदार महिलेचे सदाशिव पेठेत ‘पीएफटी हॉलिडेज’ नावाचे कार्यालय आहे. त्यांच्या कंपनीकडून ग्राहकांच्या पर्यटन सहलींचे नियोजन करण्यात येते. विमानाचे तिकीट आणि हॉटेल बुकिंगसाठी तक्रारदार महिलेने एका व्यक्तीबरोबर संपर्क साधला होता. त्या व्यक्तीने विश्‍वास संपादन करून सुरुवातीला जानेवारी २०१९ ते मार्च २०१९ पर्यंतचे बुकिंग वेळेवर करून दिले होते.

नंतर घेतलेल्या पैशांतून मात्र फसवणूक केली. त्यामुळे आपले उर्वरित पैसे द्यावेत, अशी मागणी करूनदेखील त्यांना हे पैसे देण्यात आले नाहीत. या संदर्भात या महिलेने पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. तक्रार अर्जाची चौकशी केल्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस. एम. खानविलकर करीत आहेत.

बुकिंगव्यतिरिक्तची रक्कम खिशात

– आधीच्या चांगल्या अनुभवामुळे तक्रारदार यांनी एप्रिल २०१९ ते जून २०१९ पर्यंत ग्राहकांच्या सहलींचे बुकिंग करण्यासाठी संबंधित व्यक्तीला २१ लाख ७५ हजार रुपये दिले होते.

– त्यापैकी या व्यक्तीने आठ लाख ३५ हजार ९०० रुपये रकमेचे बुकिंग केले.

– मात्र, उर्वरित रक्कम १३ लाख ३९ हजार १०० रुपयांचे बुकिंग न करता तक्रारदार यांची फसवणूक केली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Road Accidents in India: हा तर निव्वळ आत्मघात – road accidents after lockdown in india

करोनामुळे देशभरात वाहतूक मंदावली होती आणि त्यामुळे अपघात व अपघाती मृत्यूंची संख्याही कमी झाली होती. मात्र, आता टाळेबंदी संपल्यानंतर पुन्हा रस्तेअपघातांचे प्रमाण करोनापूर्व...

Recent Comments