Home शहरं पुणे pune news News : पाच ठिकाणी स्वॅबची सुविधा - swab facility in...

pune news News : पाच ठिकाणी स्वॅबची सुविधा – swab facility in five places


म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे शहरात प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये रुग्णांची संख्या अधिक आढळून येत असल्याने पूर्वीच्या स्वॅबच्या केंद्रामध्ये आता वाढ करण्यात आली आहे. आणखी पाच ठिकाणी स्वॅबची केंद्रे वाढविण्यात आल्याने सातशेवरून स्वॅबची दररोजची सरासरी संख्या १६००पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.

सध्या भवानी पेठ, ताडीवाला रोड, येरवडा, शिवाजीनगर-घोले रोड या भागांत सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. या भागांमध्ये रुग्णांसह त्यांच्या संपर्कातील संशयितांची स्वॅब चाचणी करण्यासाठी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यामध्ये लायगुडे दवाखाना, खराडी, बोपोडी येथील दवाखान्यांसह सिंहगड कॉलेज, बाणेर येथील निकमार आणि नायडू रुग्णालयात स्वॅब केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

‘सध्या शहरातील रुग्णांची संख्या अधिक वाढत आहे. त्याचे चित्र पाहता गेल्या आठवड्यापासून शहरात आणखी पाच स्वॅब केंद्रे वाढविण्यात आली आहेत. त्याशिवाय काही ठिकाणी १०८ रुग्णवाहिकांमधूनही रुग्णांसह संशयितांचे स्वॅब घेण्यात सुरुवात केली आहे. पाच ठिकाणी नव्याने स्वॅब घेण्याची सुविधा सुरू केली आहे. त्यात महात्मा फुले शाळा (ताडीवाला रस्ता), लहुजी वस्ताद शाळा (येरवडा), भारत इंग्लिश स्कूल (शिवाजीनगर), सावित्रीबाई फुले शाळा (भवानी पेठ), साने गुरुजी शाळा (पर्वती, सिंहगड रोड) या नव्या केंद्राचा समावेश आहे. रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यास त्यांना ‘क्वारंटाइन’ करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

एका आठवड्यापूर्वी सहाशेपर्यंत चाचण्या घेण्यात येत होत्या. त्यानंतर सुविधा केंद्रे वाढविण्यात आल्याने आता चाचण्यांची संख्या १५०० ते १६००पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. साधारणतः पुण्यात एकूण चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह येण्याचे १० ते १२ टक्के प्रमाण आहे, याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

lord arjuna promise: आस्वाद – dr namdev shastri article on lord arjuna promise and taste

न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीसत्य जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत मनुष्यात संशय असतो. आपल्यात संशय आहे, याचा आपल्यालाच संशय येत नसतो, तरीदेखील तो असतो. याचं...

Adesh Bandekar Selected As Brand Ambassador Of Matheran – आदेश बांदेकर बनले माथेरानचे ब्रँड अॅम्बॅसेडर; नेमकं काय करणार? | Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधीमहाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानचे ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांची निवड करण्यात आली...

Recent Comments