Home शहरं पुणे pune news News : पालिकेचा आणखी एक कर्मचारी बाधित - another employee...

pune news News : पालिकेचा आणखी एक कर्मचारी बाधित – another employee of the municipality was affected


म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या मुख्य इमारतीत करोनाशी संबंधित असलेल्या आणखी एका विभागातील कर्मचाऱ्यास करोनाची लागण झाली आहे. या विभागात तातडीने औषध फवारणी करून, इतर आ‌वश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महापालिकेने नुकतेच जाहीर केल्यानुसार ४८ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली असून, त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये करोनाची लागण होण्याचे प्रमाण लक्षणीय असल्याची माहितीही पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना नुकतीच देण्यात आली आहे.

महापालिकेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विभागात करोनाबाधितांच्या कॉन्टक्ट ट्रेसिंगची जबाबदारी आहे. या विभागातील कर्मचाऱ्यास करोनाची लक्षणे दिसत नसल्याने तो सातत्याने कामावर येत होता. त्याच्या सोबतच्या इतर आठ जणांची तातडीने तपासणी करण्यात येत आहे.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या ४८ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. लागण झालेल्या व्यक्तींपैकी ३७ व्यक्ती या महापालिकेचे पूर्ण वेळ कर्मचारी असून, इतर ११ कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करतात. बाधित झालेल्या ४८ पैकी २४ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pune Crime: अमोल कोल्हेंच्या नावाने बिल्डरकडे मागितले पैसे; पुढे काय घडले पाहा – money demanded from builder in the name of amol kolhe

पुणे:लॉकडाऊन काळात एका बिल्डरला खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याची बतावणी करून फसविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्या विरोधात वानवडी...

Recent Comments