Home शहरं पुणे pune news News : 'पीसीएमसी'तील उद्योग अटींसह सुरू - pcmc starts with...

pune news News : ‘पीसीएमसी’तील उद्योग अटींसह सुरू – pcmc starts with industry terms


म. टा. प्रतिनिधी, पिंपरीकामगारांची उपस्थिती ३३ टक्के आणि काम करणारे कामगार या शहराच्या हद्दीत वास्तव्य करणारे असावेत, या अटींवर पिंपरी-चिंचवडमधील उद्योग सुरू करण्याची परवानगी देण्यात येईल, असे महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शनिवारी स्पष्ट केले. उद्योग सुरू करण्यापूर्वी राज्य सरकारची वेब परवानगी घ्यावी, असेही नमूद केले आहे.संचारबंदीच्या काळात कोणतेही कारखाने सुरू करण्यावर प्रतिबंध आहे. त्यामुळे उद्योगनगरी ठप्प आहे. जिल्ह्यातील रांजणगाव, शिरूर, चाकण, तळेगाव, जेजुरी आणि अन्य भागांतील उद्योग सुरू करण्यास यापूर्वीच परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील उद्योगांनाही काही अटींवर परवानगी देण्याच्या मागणीने जोर धरला होता. या मागणीची दखल घेऊन राज्य सरकारने उद्योग पूर्ववत सुरू करण्यास परवानगी दिली आहे.सरकारच्या महसूल आणि वनविभागाच्या आदेशानुसार काही अटींवर कारखाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी महापालिका स्तरावर नियमावली तयार करण्यात आली आहे. प्रतिबंधित (कंटेन्मेंट) क्षेत्र वगळता अन्य भागांतील उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नियम आणि अटींचे पालन केल्यास उद्योग सुरू करण्यास परवानगी राहणार आहे, असे आयुक्त हर्डीकर यांनी म्हटले आहे. कारखान्यातील कामगारांची ३३ टक्के उपस्थितीबरोबरच हे कामगार शहराच्या हद्दीतील असावेत, बाहेरून कामगारांना ये-जा करण्यास परवानगी राहणार नाही, असे स्पष्ट केले आहे. कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठीही काही नियम केले आहेत. त्यांच्या कामांच्या वेळा निश्चित केल्या आहेत; याशिवाय उद्योग पूर्ववत सुरू करण्यासाठी राज्य सरकारच्या permission.midcindia.org वेबपोर्टलवरून परवानगी घ्यावी, याकडे लक्ष

वेधले आहे.उद्योग सुरू करण्याच्या नियम आणि अटी जाचक असल्याचे नमूद करीत विविध संस्था आणि संघटनांनी त्या शिथिल करण्याची मागणी केली आहे. ‘लॉकडाउन-४’ लागू होण्यापूर्वी काही अटींमध्ये शिथिलता आणणे गरजेचे आहे, तरच उद्योगचक्र फिरण्यास मदत होईल, असे स्पष्ट केले आहे. राज्य सरकार, महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने संयुक्तरित्या अटी शिथिल कराव्यात, असे निवेदनात नमूद केले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health workers in nashik: आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा टक्का वाढणार – nashik local health system has decided to increase corona vaccination for heath workers

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकजिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण ११ फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करवून घेण्याचे निर्देश आरोग्य सेवा संचालनालयाने दिले आहेत. त्यामुळे...

raksha khadse vs eknath khadse in raver: Raksha Khadse: एकनाथ खडसेंना आता सूनेचेच आव्हान; रक्षा खडसेंनी केला ‘हा’ निर्धार – raksha khadse challenges eknath...

जळगाव: माझ्या भूमिकेबाबत अनेकांच्या मनात शंका असली तरी कुठल्याही परिस्थितीत मी पक्ष सोडणार नाही व भाजपातच राहणार असल्याचे सांगत भाजप खासदार रक्षा खडसे...

Kaushal Inamdar: गाण्याचे लयतत्व हेच त्याचे प्राणतत्व – संगीतकार कौशल इनामदार – indian musical composer kaushal inamdar present various poems at marathi language conservation...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकवितेत म्हणण्यासारखे काही असावे. कधी कधी मुक्तछंदालाही आपली लय असते. ती लय संगीतकाराला सापडली तर गाणे होते. कुठल्याही गाण्याचे लयतत्व...

Recent Comments