Home शहरं पुणे pune news News : पुण्यात करोनाचे आणखी २० बळी; रुग्णसंख्या १७ हजारपार...

pune news News : पुण्यात करोनाचे आणखी २० बळी; रुग्णसंख्या १७ हजारपार – pune crosses 17000 mark with over 664 new cases


पुणे:पुणे शहर जिल्ह्यात बुधवारी ६६४ जणांना करोना संसर्ग झाला असला तरी दिवसभरात १५५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर बरे झालेल्या आतापर्यंतच्या रुग्णसंख्येने आठ हजारांचा टप्पा पार केला आहे. शहरात २७७ रुग्णांची प्रकृती गंभीर असून शहर जिल्ह्यात बुधवारी २० जणांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात एका दिवसात ५३१ रुग्णांना लागण झाली आहे. तर मंगळवारी पिंपरी चिंचवड मध्ये रुग्णांची संख्या वाढलेली असताना बुधवारी मात्र ही संख्या ९८ पर्यंत खाली आली आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २४ जणांना तर पुणे कँटोन्मेंट बोर्डासह नगरपालिका हद्दीतील ११ जणांना संसर्ग झाला आहे. आतापर्यंत पुणे शहरातील एकूण रुग्णसंख्या १३ हजार ७६० तर एकूण जिल्ह्यातील रुग्ण संख्या १७ हजार ५१५ पर्यंत पोहोचली आहे.

पुण्यात एका दिवसात १५५ रुग्ण बरे झाले आहेत. परिणामी, पुण्यात बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आठ हजारांचा आकडा ओलांडल्याची समाधानकारक बाब समोर आली आहे. पुण्यात ३४१६ एवढ्या चाचण्या दिवसभरात झाल्या असून आतापर्यंत ९७ हजार २२४ एवढ्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. रुग्णालयांमधून २७७ रुग्ण हे अद्याप गंभीर आहेत. त्यापैकी ५६ रुग्ण हे व्हेटिंलेटरवर आहेत. शहरातील विविध रुग्णालयांमधून आतापर्यंत ५००९ एवढे रुग्ण उपचाराखाली आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये होणार रॅपिड टेस्ट

करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पिंपरी-चिंचवडकरांची मोफत चाचणी करण्याची शिफारस स्थायी समितीने प्रशासनाला बुधवारी केली. या अंमलबजावणीचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला असून, रॅपिड चाचणीसाठी एक लाख किट खरेदी करण्यात येणार आहेत. शहरात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांत प्रत्येक दिवशी नव्याने उच्चांक होत असून, ठिकठिकाणी रुग्ण आढळून येत आहेत. याशिवाय पावसाळ्यात आपल्याला अधिक सतर्क रहावे लागेल, असाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपायांबाबत बैठकीत गांभीर्याने चर्चा करण्यात आली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

devendra fadnavis vs uddhav thackeray latest news: Devendra Fadnavis: फेसबुक लाइव्हमध्ये मुख्यमंत्री खरं बोलले!; करोनाबाबत फडणवीसांचा गंभीर आरोप – maharashtra budget session devendra fadnavis...

हायलाइट्स:ठाकरे सरकार केवळ फेसबुक लाइव्हमध्ये मग्न आहे!देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणावरळीत पहाटेपर्यंत बार कुणाच्या आशीर्वादाने चालतात?मुंबई: 'ठाकरे सरकार केवळ फेसबुक लाइव्हमध्ये...

हुक्का चालकांसह १७ ग्राहकांवर गुन्हे

म. टा. वृत्तसेवा, एपीएमसी पोलिसांनी रविवारी पहाटे सत्रा प्लाझा इमारतीतील कॅफे पाम अॅटलांटिस व शक्ती आर्केड इमारतीतील रंग दे बसंती या दोन ...

Aurangabad Municipal Corporation: विनामास्क १२०० नागरिकांना दंड – aurangabad municipal corporation has action against 1200 citizens for wearing not mask

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद'मास्क घाला, करोना टाळा', असे आवाहन केले जात असताना विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढतच आहे. करोना आजाराचे गांभीर्य नसलेल्या व्यक्ती...

jee main march 2021: JEE Main 2021 परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; परीक्षा कधी? वाचा – jee maim march exam 2021 application process begins at...

JEE Main 2021: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) फेब्रुवारी सत्राच्या जेईई मेन २०२१ परीक्षेची उत्तरतालिका तसेच जेईई मेन मार्च 2021 (JEE Main March 2021)...

Recent Comments