Home शहरं पुणे pune news News : पोलिस उपनिरीक्षकाला करोनाची लागण - police sub-inspector infected...

pune news News : पोलिस उपनिरीक्षकाला करोनाची लागण – police sub-inspector infected with corona


म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे पोलिस दलातील एका उपनिरीक्षकाला करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यांच्या सान्निध्यात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. आतापर्यंत शहर पोलिस दलातील २० कर्मचारी, अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. १० पोलिस कोरोनामुक्त झाले आहेत.

परिमंडळ तीनमधील एका पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या एका उपनिरीक्षकास कोरोनाची लागण झाली आहे. या अधिकाऱ्याला करोनाची लक्षणे दिसल्याने शनिवारी त्याची चाचणी घेण्यात आली होती. सोमवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्यांना कर्मचारी, अधिकाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. संबंधित उपनिरीक्षकाच्या कुटुंबाची चाचणी करण्यात येणार आहे, असे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यात करोनाची लागण झालेल्या पोलिसांचा आकडा वाढत आहे. होती. आतापर्यंत एका पोलिस कर्मचाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आवश्यक सर्व खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे. त्यांच्याकडे शहरातील कर्मचारी तसेच क्वारंटाइन व करोना झालेल्या कर्मचारी यांची काळजी घेणे, त्यांना उपचार, तसेच लागेल ती मदत करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

shaheen afridi: ‘या’ गोलंदाजाने भारताच्या जसप्रीत बुमराहचा विक्रम मागे टाकला – pakistan shaheen afridi became quickest 100 wickets in t20

नवी दिल्ली: भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह(jasprit bumrah)चा टी-२० मधील विक्रम पाकिस्तानच्या एका गोलंदाजाने मागे टाकलाय. २०१८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहीन...

Recent Comments