Home शहरं पुणे pune news News : प्रतिबंधित क्षेत्रांत घट होणार - restricted areas will...

pune news News : प्रतिबंधित क्षेत्रांत घट होणार – restricted areas will decrease


म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील ६९ प्रतिबंधित क्षेत्रांपैकी २४ ठिकाणी करोनाचे रुग्ण न आढळल्याने ही क्षेत्र लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यातील प्रतिबंधित क्षेत्रांमधून वगळले जाण्याची चिन्हे आहेत. परंतु, सध्या प्रतिबंधित क्षेत्रांत नसलेल्या २३ ठिकाणी नव्याने रुग्ण आढळल्याने ही ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रात समाविष्ट होतील, असे स्पष्ट संकेत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी रविवारी दिले. राज्य सरकारचे आदेश रविवारी प्राप्त झाले नसल्याने पुण्यातील नवीन प्रतिबंधित क्षेत्रे आज, सोमवारी जाहीर करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात लक्ष्मी रस्त्यासह शहरातील प्रमुख नऊ रस्त्यांवरील प्रतिबंधित क्षेत्रांत न येणारी दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याचे सूतोवाच त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना केले. राज्य सरकारचे आदेश आल्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात शहरात ६९ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली होती. त्यापैकी २४ क्षेत्रांमध्ये करोनाचे रुग्ण न आढळल्याने हा भाग प्रतिबंधित क्षेत्रांतून वगळण्यात येणार आहे. हा परिसर वगळला गेला, तरी यापूर्वी प्रतिबंधित क्षेत्रात नसलेल्या २३ ठिकाणी करोनाचे रुग्ण आढळल्याने त्याचा समावेश यात करण्यात येणार आहे.

खासगी कार्यालये सुरू करण्याचा निर्णयही सरकारच्या आदेशांवरच अवलंबून आहे. नव्याने तयार केल्या जाणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्रात संपूर्ण परिसराऐवजी काही इमारतीच समाविष्ट केल्या जातील. त्यामुळे पूर्वीच्या दहा चौरस किमी क्षेत्रापेक्षा प्रतिबंधित क्षेत्र कमी होईल, अशी शक्यता त्यांनी वर्तविली. महापालिका तसेच स्मार्ट सिटीचे अधिकारी प्रतिबंधित क्षेत्रांची रचना अंतिम करत असल्याने सोमवारी सायंकाळपर्यंत ही क्षेत्रे, तसेच त्यांचे क्षेत्रफळ हे निश्चित होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

नव्याने तयार केल्या जाणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्रात संपूर्ण परिसराऐवजी काही इमारतीच समाविष्ट केल्या जातील. त्यामुळे पूर्वीच्या दहा चौरस किमी क्षेत्रापेक्षा प्रतिबंधित क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे.

– शेखर गायकवाड, आयुक्त, महापालिकाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ajinkya raahne: IND vs AUS : विराट कोहलीला कर्णधारपद दिल्यानंतर अजिंक्यने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रीया, म्हणाला… – ind vs aus : ajinkya rahane given...

नवी दिल्ली, IND vs AUS : अजिंक्यने भारताला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले. पण त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अजिंक्यकडून भारतीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात...

India Innovation Index: ठाकरे सरकारने करून दाखवले!; ‘या’ यादीत महाराष्ट्राची दुसऱ्या स्थानी झेप – niti aayog announces india innovation index 2020 maharashtra ranked second

मुंबई: नीती आयोगाने २० जानेवारी २०२१ रोजी ' इंडिया इनोव्हेशन इंडेक्स २०२० ' हा आपला दुसऱ्या प्रकाशनाचा निकाल जाहीर केला असून यामध्ये तामिळनाडू...

Recent Comments