Home शहरं पुणे pune news News : फॅन्सी नंबर लिलावपुन्हा होणार सुरू - fancy number...

pune news News : फॅन्सी नंबर लिलावपुन्हा होणार सुरू – fancy number auction resumes


म. टा. प्रतिनिधी, पुणे

लॉकडाउनच्या ‘ब्रेक’मुळे अडीच महिन्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयात नवीन वाहन नोंदणी क्रमांकातील ‘फॅन्सी नंबर’चा लिलाव होणार आहे. येत्या सोमवारपासून (१५ जून) ही प्रक्रिया सुरू होणार असून, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत महसुलाचा ओघ सुरू होण्याची शक्यता आहे.

राज्यात २५ मार्चपासून प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मुख्य कामकाज बंद होते. मात्र, राज्य सरकारच्या आदेशानुसार परिवहन आयुक्तालयाने कामकाज १८ मेपासून सर्व आरटीओ कार्यालयांना वाहन नोंदणीचे कामकाज सुरू करण्याची सूचना केली. त्यानंतर जूनच्या सुरुवातीपासून रेड झोनमधील कार्यालये वगळता अन्य कार्यालयातील कामकाज वाढविण्यात आले. पुणे आरटीओ रेड झोनमध्ये असल्याने अद्याप येथे केवळ वाहन नोंदणीचे काम सुरू आहे. मात्र, त्यातही आरटीओ प्रशासन येत्या १५ जूनला नवीन टप्पा गाठणार आहे. दुचाकी वाहनांसाठी नोंदणीची नवीन सिरीज जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नियमाप्रमाणे फॅन्सी नंबरचा लिलाव केला जाणार आहे. एका सिरीजमध्ये ३४३ फॅन्सी नंबर असून, त्यांचे शुल्क निश्चित केलेले आहे. त्याव्यतिरिक्त अन्य नंबर वाहन खरेदीदाराच्या मागणीनुसार राखीव ठेवले जातात. त्यासाठीही शुल्क आकारले जाते.

Bचार टप्प्यांत होणार लिलाव

Bफॅन्सी क्रमांकांच्या लिलावासाठी आरटीओ कार्यालयात गर्दी होते. अनेकदा आरटीओतील सभागृह संपूर्ण भरलेले असते. मात्र, आता करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आरटीओ प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. एक ते ९९९९ क्रमांकासाठी चार दिवसांत लिलाव होणार आहे. संपूर्ण अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एका दिवशी अडीच हजार नंबरमधील फॅन्सी नंबरचा लिलाव होणार आहे. त्यातही एका दिवसांत वेगवेगळे स्लॉट करून लिलाव होईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.

५०० ते ६००

एका सिरीजमधील शुल्क भरून घेतले जाणारे एकूण नंबर

….

१५० ते १७५

चारचाकी वाहनांसाठी दुचाकी सिरीजमधून घेतले जाणारे फॅन्सीनंबर

…………..Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

कारस्थानांची सत्यकथा

विवेक गोविलकर यांचे '' हे पुस्तक म्हणजे शोध पत्रकारितेचा उत्तम नमुना आहे. वॉल स्ट्रीट जर्नलसाठी काम करणाऱ्या या लेखकाला दोनदा शोध पत्रकारितेचा...

tb hospital mumbai: रुग्णालयात शौचालयात रुग्णाचा कुजलेला मृतदेह – 27 years tb patient body was found in toilet in a tb hospital mumbai

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईशिवडीच्या टीबी रुग्णालयातील शौचालयात रविवारी रुग्णाचा कुजलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णाचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, तसेच मृतदेह...

Recent Comments