Home शहरं पुणे pune news News : बंदिस्त कर्मचारीघरी परतणार - returned staff will return...

pune news News : बंदिस्त कर्मचारीघरी परतणार – returned staff will return home


म. टा. प्रतिनिधी, येरवडा

‘करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आठ प्रमुख कारागृहे ‘लॉकडाउन’ करण्यात आल्यावर कैद्यांच्या सुरक्षेसाठी अधिकारी आणि कर्मचारीही कारागृहात बंदिस्त झाले आहेत. येरवडा मध्यवर्ती कारागृहात २० दिवसांपासून ‘लॉकडाउन’ झालेले १५०हून अधिक कर्मचारी रविवारी घरी परतणार आहेत. त्यांच्या जागी जाणाऱ्या नवीन कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना कारागृहात बंदोबस्ताला पाठवले जाणार आहे,’ असे पश्चिम विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी सांगितले.

येरवडा मध्यवर्ती कारागृहात अधीक्षकांसह १५० अधिकारी आणि कर्मचारी गेल्या २० दिवसांपासून बंदिस्त आहेत. या काळात त्यांना कोणत्याही कारणासाठी कारागृहाबाहेर येण्यास बंदी होती. यामुळे आता ज्यांना ‘लॉकडाउन’च्या काळात सुट्टी दिली आहे, अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रविवारपासून कारागृहात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारागृहात कामावर हजर होण्याआधी नवीन सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, यानंतरच त्यांना आत प्रवेश दिला जाणार आहे, असेही देसाई यांनी सांगितले.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pune phd student murder latest news: Pune Crime: पुण्यात पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा खून; चेहरा दगडाने ठेचला – 30 year old phd student murdered...

पुणे: पुणे येथील पाषाण भागातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल) येथे पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक...

latest opinion poll 2021: Opinion Poll: मोदी-शहांचे आव्हान परतवत ममता साधणार हॅट्ट्रिक!; दक्षिणेतील ‘या’ राज्यात सत्तांतर? – tmc to retain bengal ldf headed for...

हायलाइट्स:पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हॅट्ट्रिक साधण्याची शक्यता.आसाम भाजपकडे राहणार तर पुदुच्चेरीत कमळ फुलणार.तामिळनाडूत स्टॅलिन तर केरळात डाव्यांची जादू दिसणार.नवी दिल्ली: पश्चिम बंगाल, आसाम,...

Amravati lockdown news: Amravati Lockdown: अमरावती, अचलपुरात लॉकडाऊन वाढवला; ‘हे’ शहरच कंटेन्मेंट झोन! – lockdown in amravati achalpur extended till march 8

हायलाइट्स:अमरावती विभागात अनेक शहरांत करोनाचे थैमान.अमरावती व अचलपूरमध्ये लॉकडाऊन वाढवला.नागपुरातील स्थिती गंभीर, लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता.अमरावती: विदर्भात सध्या अमरावतीमध्ये करोनाने थैमान घातले असून...

Dilip Vengsarkar: एक महान फलंदाज,महान गोलंदाज झाला; अहमदाबादच्या पिचवर मुंबईच्या क्रिकेपटूची घणाघाती टीका – ind vs eng ahmedabad pitch wicket bad advertisement for test...

हायलाइट्स:भारताने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत १० विकेटनी विजय मिळवलाकसोटी सामना दुसऱ्याच दिवशी संपल्याने पिचवर होतेय टीकाभारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी केली मोठी टीका...

Recent Comments