Home शहरं पुणे pune news News: बाहेर जायचंय? आधी बंदोबस्त करा! - want to go...

pune news News: बाहेर जायचंय? आधी बंदोबस्त करा! – want to go out? arrange first!


म. टा. प्रतिनिधी, पुणे

विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांना समजावून सांगितले, पाठी लाठ्या घातल्या अन् शेवटी गुन्हे दाखल केले; पण अनेक नागरिक ऐकण्यास तयार नाहीत. विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे शेवटी अशा नागरिकांना बाहेर पडायचे, असेल तर त्यांनी करोना संसर्ग झालेल्या भागात पोलिसांसोबत सहा तास बंदोबस्त करावा, असा एक मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. त्याला पोलिसांकडूनही पाठिंबा मिळत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन केले जात आहे. तरीही अनेक नागरिक विनाकारण बाहेर पडत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून लाठ्यांचा प्रसाद दिला. त्यानंतर अशा नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली; पण काही नागरिक ऐकण्यास तयार नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर एक मेसेज फिरत आहे. त्याला पोलिसांकडूनही प्रतिसाद दिला जात आहे.

‘नागरिकांनो, बाहेर जायचंय? खुशाल जा. पण अगोदर करोना संसर्ग असलेल्या भागात पोलिसांसोबत सहा तास बंदोबस्त करून दाखवा. बोला… मंजूर?’ असा मेसेज फिरत आहे. अशा उपहासात्मक पद्धतीने बोलून तरी नागरिकांनी घरात बसावे, म्हणून प्रयत्न सुरू आहेत. सध्या हा मेसेज सोशल मीडीयावर भरपूर ‘व्हायरल’ झाला आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sangli crime: Sangli Crime: उपचारांसाठी डॉक्टरकडे गेला; दवाखाना बंद असल्याचे पाहून काय केलं पाहा! – sangli crime theft in doctors house accused arrested in...

सांगली:शिराळा तालुक्यातील मांगले येथील गंधा नर्सिंग होममध्ये उपचारासाठी गेलेल्या चोरट्याने दवाखाना बंद असल्याचे पाहून दवाखान्यालगत असलेल्या डॉक्टरच्या घरात चोरी केली. हा धक्कादायक प्रकार...

virat kohli: सर्वाधिक गुण असूनही भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर; विराट कोहलीने आयसीसीला विचारला सवाल – it is confusing, difficult to understand: virat kohli on...

सिडनी : भारतीय संघाचे सर्वाधिक गुण असूनही आम्ही दुसऱ्या स्थानावर का, असा सवाल भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयीसीसीला केला आहे. आयीसीसीचा नवा नियम...

illegal sand mining: Illegal Sand Mining: वाळू माफियांच्या टोळीत भाजप नगरसेवक; पोलिसांवर डंपर घालण्याचा प्रयत्न – illegal sand mining case filed against 12 including...

जळगाव: धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील गिरणा नदी पात्रात धरणगाव पोलिसांनी पहाटे अडीच ते साडेपाचच्या दरम्यान सापळा रचून वाळू माफियांच्या टोळीवर धडक कारवाई केली...

Recent Comments