Home शहरं पुणे pune news News : बीएसएनएल बंद; घरून काम थंड - bsnl closed;...

pune news News : बीएसएनएल बंद; घरून काम थंड – bsnl closed; work from home cold


म. टा. प्रतिनिधी, पुणे

सिंहगड रस्त्यावर पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ ‘बीएसएनएल’ची फायबर तुटल्याने आसपासच्या परिसरातील लँडलाइन आणि वायफाय ब्रॉडबँड गेल्या दोन दिवसांपासून बंद आहेत. या परिसरात ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसला असून, अद्याप दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलेले नाही.

पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ विकासकामे सुरू असून, त्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. त्या वेळी ‘बीएसएनएल’च्या फायबरला धक्का लागून ती तुटली आहे. त्यामुळे उद्यानाजवळील परिसर आणि पुढे जयदेवनगर, राजाराम पूल, हिंगणे, आनंदनगर या परिसरात असलेल्या शेकडो ग्राहकांची लँडलाइन कनेक्शन बंद पडली आहेत. अनेकांचे ब्रॉडबँड आणि वायफाय लँडलाइन कनेक्शनशी जोडले असल्याने या सेवाही बंद पडल्या असून, घरात बसून काम करणाऱ्यांची पंचाईत झाली आहे.

सेवा विस्कळीत झालेल्या ग्राहकांनी ‘बीएसएनएल’च्या ग्राहक सेवा केंद्राकडे तक्रारी करूनही अद्याप दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. मनुष्यबळ अपुरे पडत असल्याचे स्पष्टीकरण ‘बीएसएनएल’कडून दिले जात आहे. लवकरात लवकर दुरुस्ती करून ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे, असे स्पष्टीकरण ‘बीएसएनएल’कडून दिले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र दुरुस्तीसाठी विलंब केला जात असल्याचे चित्र आहे. या संदर्भात ‘बीएसएनएल’च्या अभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण अथवा माहिती दिलेली नाही.

हा तिढा कधी सुटणार?

महापालिका शहरात जिथे कुठे विकासकामे करते, तेव्हा प्रत्येक वेळी ‘बीएसएनएल’ची ऑप्टिक फायबर तुटून समस्या निर्माण होतात. कामे सुरू करण्यापूर्वी ‘बीएसएनएल’ला पूर्वकल्पना द्यावी, असे वारंवार सांगूनही ठेकेदार ऐकत नाहीत, अशी तक्रार ‘बीएसएनएल’कडून केली जात आहे. महापालिका आणि बीएसएनएल यांच्यातील हा तिढा कधी सुटणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘तक्रारींना दाद द्या’

ग्राहकांचे कनेक्शन बंद पडल्यानंतर त्यांची कामे खोळंबतात, अशा वेळी ‘बीएसएनएल’कडे तक्रार करूनही त्याला अनेक दिवस प्रतिसाद दिला जात नाहीत, अशी खंत ग्राहक व्यक्त करीत आहेत. सध्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या साह्याने काम सुरू आहे, हे मान्य असले, तरी ग्राहकांच्या तक्रारींना निदान प्रतिसाद तरी द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

करोनाने पुन्हा घेतली उसळी

म. टा. खास प्रतिनिधी, जिल्ह्यात करोनाने पुन्हा उसळी घेतली असून, मंगळवारी ४२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे काही दिवसांपासून दोनशे ते तीनशेपर्यंतच सीमित...

virat kohli: IND vs ENG : सामन्यानंतर विराट कोहलीने सांगितली कोणाकडून झाली मोठी चुक… – ind vs eng : after winning 3rd test match...

अहमदाबाद, IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने १० विकेट्स राखून विजय मिळवला. पण या सामन्यानंतर या लढतीत कोणाकडून मोठी चुक झाली,...

Recent Comments