Home शहरं पुणे pune news News : ब्रिटिश लायब्ररी बंद होते आहे! - the british...

pune news News : ब्रिटिश लायब्ररी बंद होते आहे! – the british library is closing!


म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील वाचकांना इंग्रजी साहित्य, संस्कृतीची कवाडे खुली करणारी ऐतिहासिक ब्रिटिश लायब्ररी बंद होते आहे. लायब्ररीतील सर्व साहित्य यापुढे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करण्याचा निर्णय ब्रिटिश कौन्सिलने घेतला असून, शिवाजीनगर येथील लायब्ररीच्या जागेत लवकरच इंग्रजी भाषेच्या पात्रता परीक्षांचे चाचणी केंद्र सुरू होणार आहे.

येत्या जुलैपासून ब्रिटिश लायब्ररीची जागा ब्रिटनमधील विविध परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या इंग्रजी भाषेच्या ऑनलाइन चाचण्यांसाठीचे केंद्र म्हणून वापरली जाईल. ‘आमचे पुण्यातील केंद्र आता ‘बीसी एक्झामिनेशन्स अँड इंग्लिश सर्व्हिसेस इंडिया’तर्फे नियंत्रित केल्या जाणाऱ्या ‘आयईएलटीएस’ आणि इतर पात्रता परीक्षांसाठीचे अद्ययावत कम्प्युटर आधारित चाचणी केंद्र म्हणून कार्यरत राहील. ‘आयईएलटीएस’सारख्या परीक्षांना असलेल्या मागणीत प्रचंड वाढ होत असून, तरुणांना नोकरी आणि शिक्षणासाठी आवश्यक आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त पात्रता मिळविण्यासाठी हा बदल म्हणजे एक चांगली संधी ठरेल,’ असे ‘ब्रिटिश कौन्सिल इंडिया’च्या लर्निंग सर्व्हिसेस विभागाचे संचालक अंटोनिअस रघुबॅन्सी यांनी सांगितले.

‘गेल्या काही वर्षांत डिजिटल माध्यमांचा वापर वेगाने वाढला असून, तरुणांचे प्राधान्य डिजिटल माध्यमाला मिळते आहे. त्यामुळे यापुढे ऑनलाइन पद्धतीने उत्तम गुणवत्तेचे शिक्षण देण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत,’ असेही त्यांनी नमूद केले. लॉकडाउनमुळे लायब्ररी गेल्या अडीच महिन्यांपासून बंद आहे. गेल्या महिन्यात सभासदांना लायब्ररी कधी सुरू होणार, याबद्दल माहिती कळविण्यात येईल, असा ई-मेल पाठविण्यात आला होता. लायब्ररी बंद होऊन ती ऑनलाइन स्वरूपात सुरू राहणार असल्याचे ई-मेल ब्रिटिश कौन्सिलतर्फे गुरुवारी पाठविण्यात आले.

ऐतिहासिक वारसा

शहरात इंग्रजी साहित्य, युरोपातील साहित्याची ओळख पहिल्यांदा ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीने करून दिली. पुण्यामध्ये १९६०मध्ये ब्रिटिश लायब्ररीची सुरुवात झाली. त्या काळात इंटरनेटचा पर्याय नसल्याने इंग्रजी भाषेतील साहित्यासाठी ब्रिटिश लायब्ररी हे हक्काचे ठिकाण होते. सुरुवातीच्या काळात युरोपातील लेखकांची पुस्तके, महत्त्वाचे संदर्भ ग्रंथ, नियतकालिके आणि आंतरराष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्रे या लायब्ररीमध्ये मिळत होती. त्यामुळे संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक वर्षानुवर्षे ब्रिटिश लायब्ररीशी जोडले गेले होते. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत या ग्रंथालयाचे सदस्यत्व मिळण्यासाठी लोकांना अनेक महिने प्रतीक्षा करावी लागत असे. दोन वर्षांपूर्वी लायब्ररी नामदार गोखले रस्त्यावरून शिवाजीनगर परिसरात हलविण्यात आली.

लायब्ररीच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रमही यापुढे ऑनलाइन स्वरूपात सुरू राहतील. जूनअखेर डिजिटल लायब्ररीचे मोबाइल अॅपही तयार होईल. यामध्ये सर्व साहित्य वाचकांना डिजिटल व्यासपीठावर वाचायला मिळणार आहे.

– अँटोनिअस रघुबॅन्सी

संचालक, ब्रिटिश कौन्सिल इंडिया (लर्निंग सर्व्हिसेस)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

upsc capf interview: यूपीएससी सीएपीएफ भरती: मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर – upsc capf 2019-20 interview dates are released by upsc

UPSC CAPF 2019-20 interview: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) ने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहाय्यक कमांडंट) CAPF 2019-20 साठी मुलाखतीच्या तारखा जाहीर केल्या आहेत....

anil deshmukh: म्हणून CBIबाबत ठाकरे सरकारनं घेतला मोठा निर्णय; गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण – maharashtra government has revoked its order of the ‘general consent’ given to...

मुंबईः 'सीबीआय ही प्रोफेशनली काम करणारी संस्था आहे, पण त्याचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी होत असल्याची चर्चा आहे, त्यामुळंच सीबीआयला राज्य सरकारच्या परवानगीशिवाय...

Recent Comments