Home शहरं पुणे pune news News : मंदिरात लग्न केल्यानंतर स्वीकारण्यास नकार; तरुणीची आत्महत्या -...

pune news News : मंदिरात लग्न केल्यानंतर स्वीकारण्यास नकार; तरुणीची आत्महत्या – young woman has committed suicide as her boyfriend refused to marry


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

एका तरुणीसोबत मंदिरात लग्न केले असतानाही तरुणाने दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा केला. त्यानंतर मंदिरात लग्न केलेल्या तरुणीला नकार दिला. हा धक्का सहन न झाल्याने तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. किरण पांडुरंग पवार (रा. शळद, ता. बाळापूर, जि. अकोला) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आत्महत्या केलेल्या तरुणीच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून ९ जून २०२० या कालावधीत हा घटनाक्रम घडला आहे. फिर्यादीचे कुटुंब मूळचे अकोला जिल्ह्यातील आहे. ते कामानिमित्त बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे राहतात. आरोपीने फिर्यादीच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्यासोबत मंदिरात लग्नदेखील केले. लग्न झालेले असताना आरोपीने स्वतःचे दुसरे लग्न ठरवले. दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा केला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीसोबत लग्नाला नकार दिला. हा धक्का सहन न झाल्याने फिर्यादीच्या मुलीने ९ जूनला बोऱ्हाडेवाडी मोशी येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याचे अधिकारी तपास करीत आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

PM Modi: PM मोदींचा जागतिक पुरस्काराने सन्मान; म्हणाले, ‘भारतीय जनतेला…’ – pm modi conferred with the ‘global energy and environment leadership award’

नवी दिल्लीः ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचे अनेक आघाड्यांवरील अभियानन आणि जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पंतप्रधान मोदी यांना शुक्रवारी सेरावीक ग्लोबल एनर्जी...

Recent Comments