Home शहरं पुणे pune news News : महाविद्यालये १५जूनपासून - colleges from 15th june

pune news News : महाविद्यालये १५जूनपासून – colleges from 15th june


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नवे शैक्षणिक वर्ष एक सप्टेंबरपासून, तर यापूर्वीच अभ्यासक्रमांना प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष एक ऑगस्टला सुरू करण्याचे सूचना दिलेल्या असतानाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा प्रश्न पूर्णपणे सुटला नसताना; तसेच करोनाचा प्रादुर्भाव असताना शैक्षणिक वर्ष तातडीने सुरू करण्याचा निर्णय का घेण्यात आला, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकासंबंधी निर्णयाचे सविस्तर परिपत्रक विद्यापीठाने वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे.

यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे यूजीसीने सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना नवे शैक्षणिक वर्ष एक सप्टेंबरपासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्याचप्रमाणे विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष एक ऑगस्टपासून सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी विद्याशाखेतील सायन्स, इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर, फार्मसी यांचे पदवी अभ्यासक्रम १५ जूनपासून, तर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम एक जुलैपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे कॉमर्स आणि मॅनेजमेंट विद्याशाखेतील कॉमर्सचे अभ्यासक्रम १५ जूनपासून; तर मॅनेजमेंटचे अभ्यासक्रम एक जुलैपासून सुरू होणार आहेत. ह्युमॅनिटीज विद्याशाखेतील कला, सामाजिक शास्त्रे व अभ्यासक्रम १५ जूनपासून, तर विधी अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष एक जुलैपासून सुरू करण्यात येणार आहेत. इंटरडिसीप्लिनरी विद्याशाखेच्या अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष एक जुलैपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांचे शैक्षणिक वर्ष १ जुलैपासून सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यापीठांचे शैक्षणिक विभाग आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या तारखांमध्ये तफावत का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. विविध अभ्याससक्रमांच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी, निकाल जाहीर झालेला नाही. तर, अनेक विद्यार्थ्यांना बॅकलॉग विषयांच्या परीक्षा होणार की नाही, याची चिंता असताना विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच करोना प्रादुर्भाव राज्यात जैसे थे आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही रेड झोन, कंटेन्मेंट झोनसाठी राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे.

शैक्षणिक वर्षाला सुरुवात म्हणजे प्रशासकीय कामकाज १५ जूनपासून करण्यात येणार आहे. विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियांची तयारी करावी लागेल; तसेच अनेक प्रशासकीय कामे असल्याने, हे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येत आहे. त्याचा क्लासरूम टिचिंगशी संबंध नाही. विद्यार्थ्यांना १५जूनपासून अध्यापन करण्यात येणार नसून, सध्यातरी ते शक्य नाही.

– डॉ. एन. एस. उमराणी, उपकुलगुरू,

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Bharti Singh and Haarsh Limbachiyaa Gets Bail in Drug Case NCB – अमली पदार्थ प्रकरणात भारती आणि हर्ष यांना दिलासा; जामीन मंजूर

मुंबई: अमली पदार्थ प्रकरणात अटकेत असलेली कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना रविवारी सुटीकालीन न्यायालयाने ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली...

Recent Comments