Home शहरं पुणे pune news News : मांडूळ तस्करी पोलिस कर्मचारी ताब्यात - mandul smuggling...

pune news News : मांडूळ तस्करी पोलिस कर्मचारी ताब्यात – mandul smuggling police personnel in custody


वनविभागाची कारवाई

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबईतील पोलिस सहायक निरीक्षक; तसेच पुण्यातील चतुशृंगी पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्यास असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला नाशिक शहरात मांडूळ तस्करी प्रकरणात पकडण्यात आले आहे. विशेष म्हणजे पुण्यातील कर्मचारी ड्युटीवर असताना कोणालाही न सांगता गेला असल्याचे पुढे आले आहे. मांडूळ विक्री करण्यासाठी गेल्यानंतर वनविभागाने केलेल्या कारवाईत त्यांना पकडण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पोलिस सहायक निरीक्षक विश्वास चव्हाण आणि पोलिस कर्मचारी दीपक धाबेकर अशी पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी नाशिक ग्रामीण येथील येवला पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चव्हाण हे काही वर्षांपूर्वी पुणे शहर पोलिस दलात कर्तव्यास होते. त्यांना पाषाण पोलिस चौकी देण्यात आली होती. तर, कर्मचारी धाबेकर हेदेखील याच चौकीत नेमणुकीस होते.

मागील वर्षी चव्हाण यांची मुंबईत बदली झाली. दरम्यान, कर्मचारी धाबेकर आणि चव्हाण यांना बुधवारी दुपारी नाशिक ग्रामीण पोलिसांनी मांडूळ विक्री प्रकरणात पकडले. त्या वेळी दोघे पोलिस असल्याचे समोर आले. त्याची माहिती चतुशृंगी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी कर्मचारी धाबेकर यांची पाषाण चौकीत चौकशी सुरू केली. त्या वेळी ते नसल्याचे दिसून आले. रात्री उशिरा मांडूळ प्रकरणात दोघांना पकडण्यात आले आहे. वनविभागाने कारवाईकरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याचे समजले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sujay vikhe patil: ‘शरद पवारांवर विश्वास ठेवायचा की मोदींवर? हे जनतेनेच ठरवावे’ – bjp mp sujay vikhe clears stand on k k range issue

अहमदनगर: ‘के के रेंज प्रश्नासंदर्भात आम्ही जी भूमिका तत्कालीन दौऱ्यात मांडली त्यावर आजही ठाम आहोत. त्या भूमिकेत कोणताही बदल नाही. त्यामुळे आता शरद...

sujay vikhe patil: ‘मी भाजपमध्ये नवीन आहे; खडसेंबद्दल काय बोलणार?’ – how can i comment on eknath khadse, says bjp mp sujay vikhe patil

अहमदनगर: 'भारतीय जनता पक्षात मी नवीन आहे. मला एकच वर्ष झालं आहे. त्यामुळं ४० वर्षे पक्षात असलेल्या व्यक्तीवर मी टीकाटिप्पणी काय करणार,' अशी...

Recent Comments