Home शहरं पुणे pune news News : मास्क नसल्यास पाचशे रुपये दंड - a fine...

pune news News : मास्क नसल्यास पाचशे रुपये दंड – a fine of five hundred rupees for not wearing a mask


म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शहरात फिरताना मास्क न घालणाऱ्या नागरिकांना पाचशे रुपये दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत. करोनाबाधित अथवा संशयितांकडून फिरताना शिंकणे, खोकणे यामुळे विषाणूंचा संसर्ग वाढू नये, यासाठी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. शहरात ‘मॉर्निंग वॉक’ला बाहेर पडणाऱ्या नागरिकांनाही मास्क बंधनकारक करण्यात आले असून चालताना अथवा व्यायाम करताना श्वसनाची काळजी घेण्याचे आवाहनही महापालिका आयुक्तांनी केले आहे.

सार्वजनिक ठिकाणी फिरताना नागरिकांनी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र तथा राज्य सरकारनेही काढलेल्या आदेशांमध्ये मास्क घालणे बंधनकारक आहे. त्यानुसार पुणे महापालिकेनेही मंगळवारी काढलेल्या आदेशांमध्ये मास्क घालणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. महापालिका आयुक्त गायकवाड यांनी मास्क न घालणाऱ्या नागरिकांना पाचशे रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला असून त्याचे स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या दंडाची आकारणी केवळ महापालिका अधिकारी, सहायक आयुक्त; तसेच या अधिकाऱ्यांनी अधिकार दिलेल्या व्यक्तींनाच या दंडाची आकारणी करता येणार आहे. त्यामुळे मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर दंड आकारण्याचे अधिकार हे केवळ महापालिकेलाच असल्याचे आयुक्त गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ramchandra Guha Criticize N. Srinivasan And Sourav Ganguli’s Role In Indian Cricket – अमित शहा यांच्याबरोबर कोण चालवंतय बीसीसीआय, रामचंद्र गुहा यांनी केला गंभीर...

मुंबई : राजकारण आणि क्रिकेट यांचा संबंध फार वर्षांपासून येत आला आहे. पण सध्याच्या घडीला भारताचे गृह मंत्री अमित शहा हे बीसीसीआय चालवत...

Katrina Kaif Covid-19 Test Before Shoot Watch Video – कतरिना कैफने शेअर केली तिची करोना टेस्ट, लवकर सुरू करणार शूटिंग

मुंबई- करोना व्हायरसचा वाढा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुरुवातीच्या काळात जगभरात लॉकडाउन करण्यात आलं. सिनेसृष्टीतही यातून सुटली नाही. अनेक निर्बंधासह शूटिंगचं काम तातडीने बंद...

Recent Comments