Home शहरं पुणे pune news News : मास्क न घालणाऱ्यांची पोलिसाला धक्काबुक्की - those who...

pune news News : मास्क न घालणाऱ्यांची पोलिसाला धक्काबुक्की – those who do not wear masks push the police


म. टा. प्रतिनिधी, पुणे

घराबाहेर पडताना मास्क लावणे बंधनकारक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. चेहऱ्यावर मास्क न लावता रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यासाठी आलेल्या व्यक्तीला हटकल्याने झालेल्या वादात तीन जणांनी पोलिस शिपायाला धक्‍काबुक्‍की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धनकवडी परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी अमित जाधव यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रत्येक नागरिकाने मास्क घालूनच बाहेर पडावे, असे बंधनकारक आहे. मास्क न लावता बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या याची अंमलबजावणी केली जात आहे.

धनकवडी येथील एक नागरिक घराबाहेर येऊन कचरा टाकत होता. या नागरिकाने तोंडाला मास्क लावला नसल्याने पोलिस शिपायाने त्याला विरोध केला. तसेच, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे या कर्मचाऱ्याने सांगितले. त्या वेळी या नागरिकांसह अन्य दोन नागरिक असे तिघेही या पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून आले. यानंतर मदत घेण्यासाठी हा कर्मचारी दुचाकीवरून पोलिस स्टेशनकडे निघाला असता आरोपींनी त्यांचा पाठलाग करून त्यांची दुचाकी तीन हत्ती चौक येथे अडविली. तेथे धमकावून त्यांना धक्‍काबुक्‍की केली. सहायक पोलिस निरीक्षक एस. पी. पाटील तपास करत आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kitab-i-Nauras book: सांगीतिक मूल्यांचा ऐतिहासिक ग्रंथ – dr balasaheb labade book review on kitab-i-nauras book

डॉ. बाळासाहेब लबडे'किताबे नवरस' हा मूळ विजापूरचा सुलतान इब्राहीम आदिलशहा दुसरा याने दखनी भाषेत लिहिलेला ग्रंथ. या ग्रंथाचा डॉ. सय्यद याह्या नशीत यांनी...

Recent Comments