Home शहरं पुणे pune news News : मुंबईत १९ हजार नागरिकांचे स्थलांतर - migration of...

pune news News : मुंबईत १९ हजार नागरिकांचे स्थलांतर – migration of 19,000 citizens in mumbai


‘निसर्ग’ वादळापासून बचावासाठी पालिकेची मोहीम; सीसीटीव्हीद्वारे नजर

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या विविध भागांतील तब्बल १९ हजार नागरिकांचे महापालिका शाळा व इतर ठिकाणी स्थलांतर करण्यात आले होते. तर, गिरगाव, वरळी, दादरसह सहा प्रमुख चौपाट्यांवर अग्निशमन दलाने आपली यंत्रणा उभारली होती.

कुलाबा, वरळी, दादर, खार, जुहू, मालाड, मढ, गोराई या किनारपट्टीवरील; तसेच दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या घाटकोपर, साकीनाका, अॅन्टॉपहिल, मालाड, अंधेरी या भागातील सुमारे १९ हजार नागरिकांचे स्थलांतर करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. यासाठी सुमारे ३५ शाळांमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. तर, सुमारे तीन हजार नागरिकांनी पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन स्वत: स्थलांतर केले असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. जुहू येथील ॠतंबरा महाविद्यालयात ३०५ जणांची सोय करण्यात आली होती. स्थलांतरित नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले.

९३ लाइफगार्डची फौज

मुंबई अग्निशमन दलातर्फे गिरगाव, दादर, वांद्रे, जुहू, अक्सा, गोराई या सहा चौपाट्यांवर ९३ जीवरक्षकांसह जीवरक्षक बोटी, एनडीआरएफची टीम, रेस्क्यू बोट, जेट स्की यासह आवश्यक यंत्रसामग्री तैनात करण्यात आली होती. महापौर किशोरी पेडणेकर व अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी दादर, गिरगाव, माहीम, वर्सोवा, जुहू तसेच वरळी या चौपाट्यांना आणि पाणी साचणाऱ्या सखल भागांना भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला.

……

पाच हजार सीसीटीव्हींची नजर

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (एनडीआरएफ) कुलाबा, वरळी, दादर, खार, जुहू, मालाड, मढ, बोरीवली येथे आठ आणि नौदलाच्या पाच तुकड्या विविध ठिकाणी करण्यात आल्या होत्या. पालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्षातील पाच हजारांहून अधिक सीसीटीव्हीवरून नजर ठेवण्यात आली.

…….

११७ झाडे कोसळली

चक्रीवादळामुळे कुलाबा, काळाचौकी, सायन, घाटकोपर, दादर, नरीमन पॉइंट येथील जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग यासह शहर आणि उपनगरातील विविध ठिकाणी सुमारे ११७ झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. शहरात ३९, पूर्व उपनगरात ४०, तर पश्चिम उपनगरात ३८ झाडे कोसळली. सायन येथे झाड कोसळून एका टॅक्सीचे नुकसान झाले. झाडे हलविण्याचे काम करण्यात आले असून या घटनांमध्ये कोणीही जखमी झालेले नाही.

……

३९ ठिकाणी शॉर्टसर्किट

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत एकूण ३९ ठिकाणी शॉर्टसर्किट होण्याच्या घटना घडल्या. त्यात शहरात १९ तर पूर्व आणि पश्चिम उपनगरात २० ठिकाणांचा समावेश आहे. तर एकूण नऊ ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. शहरात तीन पूर्व आणि पश्चिम उपनगरात सहा ठिकाणी घरांचा भाग कोसळला. या दुर्घटनांमध्ये कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

…..

करोना रूग्णांना हलवले

वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानात उभारलेल्या करोना आरोग्य केंद्रातील २१२ रुग्णांना वरळी येथील एनएससीआय करोना आरोग्य केंद्रात स्थलांतरित करण्यात आले. आहे.

……

पालिका आयुक्तांची पाहणी

पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी बुधवारी सकाळी पालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात भेट देऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे विविध विभागांतील परिस्थितीची आढावा घेतला. त्यानंतर आयुक्तांनी विविध शाळांमध्ये स्थलांतरित केलेल्या नागरिकांची विचारपूस केली. पावसाचे तुंबलेले पाणी समुद्रात फेकण्यासाठी उभारण्यात आलेले वरळी येथील लव्‍हग्रोव्‍ह, इर्ला पंपिग स्टेशन, वर्सोवा समुद्रकिनारा, वरळी सी फेस परिसर, नेहरु विज्ञान केंद्र येथील तात्पुरता निवारा, बीकेसी परिसरातल्‍या मिठी नदीची व फ्लड गेटची पाहणी केली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

devendra fadnavis covid positive: देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण; राऊत म्हणाले… – sanjay raut wishes devendra fadnavis for speedy recovery

मुंबईः राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. संजय राऊत यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी 'फडणवीस लवकर बरे होवोत यासाठी...

coronavirus in Nashik: coronavirus – दसऱ्याच्या पूर्वसंध्येला ६२८ करोनामुक्त – nashik reported 270 new corona cases and 5 death cases in yesterday

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकविजयादशमी अर्थात दसऱ्याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात अवघ्या २७० संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर त्याहून सुमारे अडीच पट म्हणजेच...

Recent Comments