Home शहरं पुणे pune news News : मृतांची संख्या २०० वर - death toll rises...

pune news News : मृतांची संख्या २०० वर – death toll rises to 200


म. टा. प्रतिनिधी, पुणे

करोनाच्या विषाणूचा विळखा आणखी घट्ट होत असल्याचे शनिवारी रुग्णसंख्या आणि मृत्युमुखींच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. रुग्णसंख्या दोनशेच्या पुढे गेली, तर मृतांच्या संख्येनेही आता २००चा आकडा ओलांडला आहे. त्यामुळे पुणेकरांपुढे आणखीच चिंता निर्माण झाली आहे. मृतांमध्ये एका तृतीयपंथाचा समावेश असल्याचे दिसून आले. शहर जिल्ह्यात २२८ जणांना लागण झाली, तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे; त्याशिवाय १४९ रुग्ण गंभीर असून, केवळ ६८ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

गेल्या २४ तासांत ससून, औंधचे जिल्हा रुग्णालय; तसेच खासगी रुग्णालयांमधून ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यात चार रुग्ण ससून रुग्णालयात दगावले. ११ मृतांमध्ये आठ पुरुषांसह तीन महिलांचा समावेश आहे, तर ४६ वर्षांपासून ते ८४ वर्षांपर्यंतच्या रुग्णांचा यात समावेश आहे. हडपसर- रामटेकडी, नाना पेठ, रास्ता पेठ, ताडीवाला रोड, भवानी पेठ, मंगळवार पेठ, गुलटेकडी, येरवडा या भागातील व्यक्तींचा मृतांमध्ये समावेश आहे.

११ रुग्णांपैकी तीन रुग्ण हे काल, शुक्रवारी सायंकाळी पावणेसात ते रात्री ११.४५ वाजेदरम्यान मृत्यू पावले, तर शनिवारी मध्यरात्री २.४५ वाजल्यापासून सायंकाळी ५.३०पर्यंत आठ रुग्णांचा मृत्यू झाला. शनिवारी मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या मृत्युसमयीच्या वेळा पाहता पाऊण तास ते तीन तासांच्या अंतराने आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश रुग्णांचा मृत्यू हा अवघ्या दोन ते तीन दिवसांच्या उपचारादरम्यान झाल्याचे माहितीतून समोर आले. मृतांमध्ये भवानी पेठेतील एका तृतीयपंथीय व्यक्तीचा समावेश आहे. त्यांना अन्य आजारही होते.

रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना करोनाचा संसर्ग होता; त्याशिवाय रक्तदाब, मधुमेह, हायपोथोरॅडिझम, लठ्ठपण, कार्डिओमायोपॅथी, श्वसनविकार, लिव्हर सिरॉसिस; तसेच न्यूमोनिया, सीओपीडी यांसारखे अन्य दुर्धर आजार होते. त्यामुळे कमी कालावधीत त्यांचा ससूनसह अन्य रुग्णालयातही उपचार घेताना मृत्यू झाल्याचे माहितीतून अधोरेखित झाले आहे.

रुग्णसंख्येचा पुन्हा उच्चांक

पुणे शहरात रुग्णंसख्येने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. एकट्या पुण्यात २०२ जणांना लागण झाली आहे, तर पुणे ग्रामीण, पुणे कँटोन्मेंट; तसेच पिंपरी-चिंचवड भागात २६ जणांना लागण झाली आहे. त्यामुळे पुणे शहर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या २२८ झाली आहे. एकूण रुग्णांची संख्या ३,७९५ पर्यंत पोहोचल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता चार हजारांच्या जवळ पोहोचली आहे. शहर जिल्ह्यात ११ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २०२ झाली आहे. परिणामी, पुणेकरांसह आरोग्य विभागाला मोठी डोकेदुखी झाली आहे.

Bपुण्यातील शनिवारची स्थितीB

बरे होऊन घरी गेलेले पॉझिटिव्ह रुग्ण : ६८

ससून रुग्णालयातील रुग्ण : ७

नायडू रुग्णालयातील रुग्ण : ९६

खासगी रुग्णालयातील रुग्ण : ९९

गंभीर : १४९

आजचे मृत्यू : ११

पॉझिटिव्ह एकूण : ३,७९५

(शहर ३,३०८, पिंपरी-चिंचवड १९१, पुणे ग्रामीण ९४ + पुणे कँटोन्मेंट- जिल्हा रुग्णालय २०२, एकूण २९६)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Corona Vaccination: Corona Vaccination: राज्यात आज ३५ हजार ८१६ कर्मचाऱ्यांचे लसीकरण, धुळ्यात १४४% लसीकरण – 35 thousand 816 employees were vaccinated in the state...

मुंबई: राज्यातील एकूण ४७७ केंद्रांवर आज तब्बल ३५ हजार ८१६ ( ७४ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण (Corona Vaccination) करण्यात आले. राज्यात आज...

coronavirus in aurangabad: २४ बाधितांची भर; ४८ जणांची सुटी – aurangabad corona update : aurangabad reported 24 new corona cases in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णसंख्येचा आकडा दिवसेंदिवस कमी होत आहे. रविवारी जिल्ह्यात २४ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर, ४८ जण बरे होऊन...

Recent Comments