Home शहरं पुणे pune news News : मेट्रोच्या कामात भूमिपुत्रांना संधी - opportunity for bhumiputras...

pune news News : मेट्रोच्या कामात भूमिपुत्रांना संधी – opportunity for bhumiputras in metro work


पुणे : शहरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामांमध्ये लवकरच स्थानिक तरुणांना रोजगार मिळण्याची संधी आहे. त्यामुळे परप्रांतीय श्रमिकांसोबतच पुढील काळात राज्यातील भूमिपुत्रांना मेट्रोसाठी काम करता येणार आहे.

परप्रांतीय श्रमिकांअभावी शहरातील मेट्रो प्रकल्पाच्या कामात खंड पडू द्यायचा नसेल, तर राज्यातील भूमिपुत्रांना कामाची संधी द्या, त्यांना आवश्यक कौशल्ये प्राप्त करण्यासाठी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केल्या. मेट्रोसारख्या पायाभूत प्रकल्पांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरातीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचा, असेही त्यांनी सुचविले.

राज्यातील पुण्यासह मुंबई, नागपूर मेट्रो प्रकल्पांचा आढावा आणि समृद्धी महामार्गाच्या प्रगतीबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. लॉकडाउनच्या काळात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प श्रमिकांअभावी रखडल्याचे समोर आल्याने परराज्यांतील श्रमिकांऐवजी राज्यातील गरजू भूमिपुत्रांना प्रकल्पांमध्ये सामावून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, असा सल्ला त्यांनी दिला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त सचिव प्रवीणसिंग परदेशी, महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील अनेक मेट्रो प्रकल्पांसाठी काम करणाऱ्यांमध्ये परराज्यांतील श्रमिकांची संख्या लक्षणीय होती. त्यापैकी अनेक श्रमिक त्यांच्या गावी परतल्याने त्यांच्यावर विसंबून राहण्याऐवजी स्थानिक युवकांना मेट्रोच्या कामात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्या. कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेच्या दृष्टीने मेट्रोचे काम सुरू असणाऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाहिराती करून भूमिपुत्रांना संधी द्या; पण पायाभूत सुविधांची कामे बंद पडू देऊ नका, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

LIVE : मराठा आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स Source link

trp scam case: टीआरपी घोटाळा : ‘रिपब्लिक’च्या पाच गुंतवणूकदारांना समन्स – trp scam case : crime branch special squad summons to five republic tv...

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई पैसे देऊन टीआरपी वाढविण्याच्या घोटाळ्यात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने रिपब्लिक टीव्हीच्या पाच गुंतवणूकदारांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स जारी...

Recent Comments