Home शहरं पुणे pune news News : मॉलची 'व्हर्च्युअल' सैर - a 'virtual' tour of...

pune news News : मॉलची ‘व्हर्च्युअल’ सैर – a ‘virtual’ tour of the mall


पुणे : मॉल बंद असल्याने तेथे जाऊन खरेदी करता येत नाही; पण आपल्या आवडत्या मॉलची ऑनलाइन सैर करून नामांकित ब्रँडचे कपडे आणि विविध वस्तूंची खरेदी करता आली तर…? सतत खरेदीची आवड असलेले पुणेकर ही कल्पना नक्कीच उचलून धरतील. शहरातील काही प्रतिष्ठित मॉलनी अशा प्रकारे सेवा द्यायला सुरुवात करून व्यवसायाला अच्छे दिन आणण्याची तयारी आरंभली आहे.

सेंट्रल मॉलतर्फे एका महिन्यापासून व्हर्च्युअल टूर आणि डोअर स्टेप ही सुविधा दिली जात आहे. या प्रयोगाबद्दल डिपार्टमेंट मॅनेजर मन्सूर शेख यांनी सांगितले, ‘संदेश आणि सोशल मीडियाद्वारे ग्राहकांना योजनांची माहिती दिली जाते. कॉलद्वारे कल जाणून घेतला जातो. त्यानंतर व्हर्च्युअल टूर आणि डोअर स्टेप हे पर्याय दिले जातात. एका लिंकच्या आधारे माहिती भरून घेतली जाते. व्हर्च्युअल टूरमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे ग्राहकांना मनपसंत वस्तू दाखवल्या जातात आणि माहिती दिली जाते. याआधारे खरेदी झाली की वस्तू घरपोच दिल्या जातात. या प्रक्रियेत विक्रेते आणि ग्राहक यांचा संबंध येत नाही. डोअर स्टेपमध्ये कल जाणून विविध वस्तू तसेच, त्या वस्तूंना अन्य ब्रँडच्या पर्यायी वस्तू घरपोच दिल्या जातात. त्यातील आवडीच्या निवडक वस्तू ग्राहक खरेदी करू शकतात.

दिवसाला किमान शंभर कॉल येत असून, या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.’ दरम्यान, पूर्वी लागू झालेल्या कोणत्याही योजना किंवा कूपन आता लागू न करण्याचे धोरण मॉलनी स्वीकारले आहे. मॉल उघडल्यानंतर या योजना पुन्हा लागू केल्या जाणार आहेत. ऑनलाइन खरेदीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कंपन्यांच्या घरपोच सेवेला करोनामुळे मर्यादा आल्याने हा कालावधी पंधरा दिवसांपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्या तुलनेत शहरातील मॉल एका दिवसात सेवा देत असल्याने त्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jinsi police station aurangabad: सुनेवर अत्याचार; सासऱ्याला अटक – aurangabad police arrested 48 years old man for sexual harassment with daughter in law

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादघरी कोणी नसल्याची संधी साधत सुनेवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या ४८ वर्षांच्या नराधम सासऱ्याला जिन्सी पोलिसांनी रविवारी (१७ जानेवारी) रात्री अटक...

bollywood celebrity on indian victory: भारतीय क्रिकेट संघाचा ऐतिहासिक विजय, बॉलिवूड सेलिब्रिटी म्हणाले … – india vs australia celebrities congratulate indian cricket team for...

मुंबई: अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला. चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने ०० विकेटनी विजय मिळवत मालिका २-१...

recruitment in ecgc: केंद्र सरकारी नोकरीची संधी; इसीजीसीमध्ये भरती – recruitment in ecgc i.e. export credit guarantee corporation

प्रा. संजय मोरेआजचं युग स्पर्धेचं बनलं आहे. त्यासाठी कठोर परिश्रम आणि योजनाबद्ध प्रयत्न करावे लागतात, याची जाणीव करून देण्याची आवश्यकता वाढली आहे. राज्यात...

health care tips in marathi: Bird Flu Precautions एव्हियन फ्लू म्हणजे काय, सुरक्षित राहण्यासाठी काय करावं? – bird flu precautions tips what is avian...

डॉ. किर्ती सबनीस, संसर्गजन्य रोगतज्ज्ञमागील काही दिवसांत राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश येथे बर्ड फ्लू किंवा एव्हियन फ्लू असल्याच्या बातम्या...

Recent Comments