Home शहरं पुणे pune news News : मोबाइलमध्ये साकारली ‘चित्राक्षरी’ - 'chitrakshari' embodied in mobile

pune news News : मोबाइलमध्ये साकारली ‘चित्राक्षरी’ – ‘chitrakshari’ embodied in mobile


शब्दचित्रांच्या कलाविष्कारातून तयार झाले ‘ई-बुक’

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मोबाइलमध्ये पक्षी, फुले, आभाळ अशी निसर्गाची काढलेली छायाचित्रे; तसेच मोबाइलमध्येच रेखाटलेली चित्रे आणि त्यांना मोबाइलमध्येच चढलेला शब्दांचा साज यातून तयार झाली ती ‘चित्राक्षरी’! लॉकडाउनच्या काळातील कलाविष्कारातून तयार झालेले हे ‘ई-बुक’ आता रसिकांच्या भेटीस आले आहे. ते मोबाइलमध्येच अगदी मोफत पाहता व वाचता येते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ई-साहित्य प्रतिष्ठानने ‘चित्राक्षरी’ हे ई-बुक नुकतेच प्रसिद्ध केले. कवयित्री व लेखिका आसावरी काकडे, मिलिंद सबनीस आणि राम केळकर यांनी काढलेल्या चित्रांना व छायाचित्रांना निर्माते-दिग्दर्शक अरुण काकतकर यांनी शब्दांचा साज चढवला आहे. ‘आसावरी काकडे या निसर्गाची व आकाशाच्या विविध छटांची मोबाइलमध्ये काढलेली छायाचित्रे काही वर्षांपासून पाठवतात. मिलिंद सबनीस मोबाइलद्वारे काढलेली पक्ष्यांची छायाचित्रे व राम केळकर मोबाइलमध्ये काढलेली चित्रे पाठवतात. चित्र आणि छायाचित्र मोबाइलवर आले, की त्याला अनुसरून मोबाइलवरच काही लिहिण्याची सवय मला लागली. ई-साहित्य प्रतिष्ठानचे सुनीळ सामंत यांना ही कल्पना आवडली आणि ई-बुक तयार झाले,’ असे काकतकर यांनी सांगितले.

‘मी दृश्य माध्यमातला आहे; तर काकडे शब्द माध्यमातील आहेत. या पुस्तकामुळे माध्यमांतर झाले आहे. कोणतेही पान उघडले, की निसर्गाच्या रंगांचा आणि त्याला अनुरूप शब्दांचा आनंद घेता येईल,’ असेही त्यांनी सांगितले. ‘सकाळी फिरताना मोबाइलमध्ये विविध दृश्ये टिपली जातात. आवडलेला फोटो मोबाइलचा वॉलपेपर होतो किंवा सुप्रभात म्हणून कुणाकुणाला पाठवला जातो. त्याला लेखनाची जोड मिळाल्याने ई-बुक तयार झाले,’ असे काकडे यांनी सांगितले. गायिका उषा मंगेशकर, चित्रकार सुहास बहुलकर व अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांनी या प्रयोगाबद्दल अभिप्राय नोंदवला आहे.

‘दाम नको; दाद द्या’

‘पुस्तक वाचल्यानंतर तीन मिनिटे खर्च करा. पहिल्या मिनिटाला लेखकांना फोन करून पुस्तक कसे वाटले ते कळवा. दुसऱ्या मिनिटाला ई-साहित्य प्रतिष्ठानला मेल करून अभिप्राय कळवा आणि तिसऱ्या मिनिटाला ते पुस्तक मित्र-मैत्रिणी व ओळखीच्या सर्वांना पाठवा. आम्ही दाम नाही, तर दाद मागत आहोत. दाद म्हणजे स्तुतीच असावी असे नाही. प्रांजळ मत, सूचना, टीका, विरोधी मत या सर्वांचे स्वागत आहे,’ असे ई-साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने कळविण्यात आले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Audio clip of Shiv Sena’s BMC corporator: पालिकेत सेना-भाजप संघर्ष – bjp corporators agitation against shivsena over audio clip of shiv sena’s bmc corporator...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढीस लागत असून, मुंबई पालिकेतही त्याचे पडसाद उमटत आहेत. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत...

Recent Comments