Home शहरं पुणे pune news News: ‘रिक्षाचालक, मालक यांना आर्थिक मदत द्या’ - 'give financial...

pune news News: ‘रिक्षाचालक, मालक यांना आर्थिक मदत द्या’ – ‘give financial help to rickshaw pullers, owners’


म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘लॉकडाउनमध्ये रिक्षा वाहतूक बंद करण्यात आल्याने रिक्षामालक आणि चालकांवर उपाससमारीची वेळ आली आहे. ज्या रिक्षाचालक, मालकांना आर्थिक सहकार्याची गरज असून, सरकारने त्यांना पाच हजार रुपयांचे सहकार्य करावे,’ अशी मागणी माजी आमदार मोहन जोशी आणि महाराष्ट्र रिक्षा मालक-चालक महासंघाचे सरचिटणीस नितीन पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. ‘महाराष्ट्रात दहा लाख आणि पुण्यात सुमारे एक लाख रिक्षामालक, चालक आहेत. त्यांचा उदरनिर्वाह दैनंदिन रिक्षा व्यवसायाच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. लॉकडाउनमध्ये व्यवसाय बंद असल्याने त्यांची आर्थिक ओढाताण होत असून, उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने त्यांना पाच हजार रुपयांचे आर्थिक साह्य द्यावे,’ असे जोशी आणि पवार यांनी निवेदनात म्हटले आहे.

.

‘आयबीएल’तर्फे मदत

एबीआयएल समूहाने (अविनाश भोसले समूह) करोना विरुद्धच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी रुपये, तसेच जिल्हा प्रशासनास ५० लाख रुपयांचा निधी देण्यात आला. करोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा उपचार पद्धती उपयुक्त असल्याचे निदर्शनास आले आहे. ही उपचार पद्धती पुण्यातील ससून रुग्णालयात उपलब्ध व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यामध्ये अत्यंत महत्त्वाचे असलेले वैद्यकीय उपकरण प्लाझ्मा सेपरेटर मशिन घेण्यासाठी २८ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त दररोज सुमारे ७०० हून अधिक गरिबांची जेवणाची व्यवस्था समूहातर्फे करण्यात येत आहे. सुमारे १० हजारहून अधिक नागरिकांना किराणा माल व सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले आहे.

.

मजुरांना मदत

रोस्ट्रम इंडिया सोशल ऑर्गनायझेशन (रिसो) संस्थेतर्फे पुणे, पिंपरी -चिंचवड, नगर रस्ता, सातारा रस्ता या भागातील सातशे मजूर कुटुंबाना महिनाभर पुरेल एवढे किराणा साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या मजुरांच्या वसाहतींमध्ये करोना विषाणूच्या संसर्गाबाबत जनजागृती करण्यात आली. पुण्याबरोबरच संस्थेतर्फे राज्यातील इतर जिल्ह्यांमधील सहयोगी संस्थांच्या माध्यमातून तीनशे कुटुंबाना आधार देण्यात आला. वैयक्तिक देणगी दाते तसेच कंपन्यांच्या कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून मदतनिधी गोळा केला आहे. यासाठी स्कायनेट एक्स्पर्ट आणि बिलाइन इम्पेक्स या कंपनीने संस्थेला सहकार्य केले आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक वैभव मोगरेकर यांनी दिली. संस्थेच्या वतीने गौतमी बिडकर, बालाजी नाईक, दिवाकर मोगरेकर तसेच राहुल पाटील आणि इतर पदाधिकारी समन्वय साधत आहेत.

.

‘मास्क’चे वाटप

वंदेमातरम संघटना, संयुक्त मेटल फिनिशर्स असोसिएशनतर्फे करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांसाठी नुकतेच १५०० मास्कचे वितरण करण्यात आले. वंदेमातरम संघटनेचे अध्यक्ष सचिन जामगे, सरचिटणीस किरण राऊत, सचिन बापतीवाले, महेश मालपाणी यांच्या हस्ते संबंधित मास्क डीसीपी स्वप्ना गोरे यांना सुपूर्द करण्यात आले. या उपक्रमासाठी गुरू गौतम मुनी चॅरिटेबल सेंटरचे संचालक सतीश बनवट यांचेही सहकार्य लाभले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ed inquiry in private firm in nashik: नाशिकच्या दोन संस्थाची ‘ईडी’कडून चौकशी – enforcement directorate investigation in cooperative organization and private firm over economic...

आर्थिक गैरव्यवहार व व्यवहारांमधील अनियमितता प्रकरणांत मातब्बरांना घाम फोडणाऱ्या 'ईडी'चे (enforcement directorate ) पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे.  Source link

Vivo Y1s: Vivo Y1s पॉवरफुल फीचर्ससोबत भारतात लाँच, किंमत ७९९० ₹ – vivo y1s with helio p35 soc launched in india, price at rs...

नवी दिल्लीः टेक ब्रँड विवोकडून भारतीय मार्केटमध्ये नवीन एन्ट्री लेवल स्मार्टफोन Vivo Y1s लाँच करण्यात आला आहे. विवो इंडियाच्या अधिकृत साइट लिस्टिंगवरून Vivo...

Recent Comments