Home शहरं पुणे pune news News : ‘लॉकडाउन ४.०’मध्ये काय खुले होणार? - what will...

pune news News : ‘लॉकडाउन ४.०’मध्ये काय खुले होणार? – what will open in lockdown 4.0?


म. टा. प्रतिनिधी, पुणे

लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याबाबत राज्य सरकारकडून सोमवारी रात्री उशिरापर्यंत स्पष्ट आदेश न आल्याने महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनीही नवीन प्रतिबंधित क्षेत्र जाहीर न करता पूर्वीच्याच आदेशांप्रमाणे लॉकडाउनची अंमलबजावणी सुरू ठेवण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे शहरातील सर्व दुकाने उघडणार का, खासगी कार्यालये कधी सुरू होणार, शहरातील नऊ प्रमुख रस्त्यांवरील दुकाने सुरू होणार की नाहीत, याबाबत नागरिकांमधील गोंधळ कायम आहे.

लॉकडाउनचा तिसरा टप्पा हा १७ मे रोजी संपला असून, राज्य सरकारने चौथा टप्पा ३१ मेपर्यंत राहणार असल्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. राज्य सरकारकडून लॉकडाउनचा चौथा टप्पा वाढविताना त्याची अंमलबजावणी कशी असेल, याबाबतचे आदेश काढले नाहीत. राज्य सरकारकडून स्पष्ट सूचना न आल्याने स्थानिक प्रशासनांकडूनही सोमवारी दिवसभर कुठलीही फारशी हालचाल झाली नाही. महापालिका आयुक्त गायकवाड यांनी शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांचा आढावा घेतला असून, त्यामध्ये जुन्या २४ प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये गेल्या १० दिवसांत नव्याने रुग्ण आढळले नसल्याचे उघड झाले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात नसलेल्या २३ ठिकाणी रुग्ण आढळल्याने हे परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येणार आहेत. महापालिका प्रशासनाने नवीन प्रतिबंधित क्षेत्रांची यादी निश्चित केली असली, तरी राज्य सरकारचे आदेश न आल्याने ते जाहीर करण्यात आलेले नाहीत.

.

पालिका प्रशासनाची अळीमिळी गुपचिळी…

शहरातील खासगी कार्यालये सुरू करण्यासाठी परवानगी मिळणार का, केशकर्तनालयांबाबत काय निर्णय होणार, घरकामगार महिलांना कामासाठी परवानगी मिळणार का, लक्ष्मी रस्त्यांसह प्रमुख नऊ रस्त्यांवरील दुकाने उघडण्यावरील बंदी उठणार का, असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत. याबाबत राज्य सरकारकडून कुठलीही भूमिका न घेण्यात आल्याने महापालिका प्रशासनही याबाबत बोलण्यात तयार नाही.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

shiv sena vs bjp in mumbai: शिवसेनेच्या ‘या’ खेळीमुळे भाजपमध्ये खदखद; संघर्ष आणखी तीव्र होणार – disput between bjp and shivsena over bmc standing...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई पालिका स्थायी समितीच्या निधी वाटपातील भेदभावामुळे भाजपकडून यापुढे विरोधक म्हणून अधिक आक्रमक भूमिका बजावली जाणार आहे. स्थायी...

registration for covid 19 vaccine: कोविड १९ लसीकरण : सामान्यांना नाव नोंदणीसाठी CoWIN खुलं – registration for covid 19 vaccine on cowin 2.0 portal...

हायलाइट्स:cowin.gov.in या वेबसाईटवर करा क्लिकनाव नोंदणीसाठी को-विन हे मोबाईल अॅप्लिकेशनही डाऊनलोड करू शकता.करोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सहा आठवड्यांपर्यंत सुरू राहीलनवी दिल्ली : कोविड...

West bengal: राष्ट्रीय आणि प्रादेशिक – editorial on the assembly elections in four states and one union territory

चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात होणाऱ्या विधानसभांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये देशातली कोणतीही निवडणूक ही साऱ्या देशाचे राजकीय तापमान...

Recent Comments