Home शहरं पुणे pune news News : वाहननोंदणीला होणारआजपासून सुरुवात - vehicle registration will start...

pune news News : वाहननोंदणीला होणारआजपासून सुरुवात – vehicle registration will start from today


आरटाओचे कामकाज अखेर पूर्वपदावर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लॉकडाउनमुळे गेल्या पावणेदोन महिन्यांपासून बंद असलेले प्रादेशिक परिवहन कार्यालयांचे (आरटीओ) दैनंदिन कामकाज आता सुरू होणार आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार परिवहन आयुक्तालयाने कामकाज सुरू करण्याची सूचना सर्व आरटीओ कार्यालयांना केली आहे. त्यानुसार वाहन नोंदणीचे कामकाज आज, सोमवारपासून सुरू होणार आहे.

राज्यात २४ मार्चपासून लॉक डाउन जाहीर करण्यात आला आहे. तेव्हापासून प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने मुख्य कामकाज बंदच आहे. आरटीओ कार्यालयात मालवाहतुकीच्या वाहनांना परवाना देण्याचे काम सुरू होते. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एप्रिल महिन्याच्या अखेरीस बीएस ४ वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे एक अर्थाने, गेल्या दीड ते पावणेदोन महिन्यांपासून बंद असलेले कामकाज सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आरटीओ कार्यालयांना कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी दिली.

ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये यापूर्वीच कामकाज सुरू करण्याबाबत स्थानिक जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. रेड झोनमधील आरटीओ कार्यालयात दहा टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज करता येणार आहे. यामध्ये, संबधित आरटीओ किंवा उपनिबंधक कार्यालय कंटेन्मेंट झोनमध्ये नसावे, अशी अट घालण्यात आली आहे.

आढावा घेऊन निर्णय घेणार

आरटीओ कार्यालयातील कर्मचारी शहराच्या कोणत्या भागातून येतात, याची माहिती घेतली जाणार आहे. त्यामध्ये कंटेन्मेंट झोन मधून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना परवानगी दिली जाणार नाही. उर्वरित कर्मचाऱ्यांचा आढावा घेऊन त्यानुसार कोणते कोणते कामकाज सुरू करावयाचे याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

…………

आजपासून सुरू होणारी कामे

– नवीन वाहनांची नोंदणी.

– यापूर्वी विक्री झालेल्या बीएस ६ वाहनांना नोंदणी क्रमांक देणे.

– पोस्ट विभागाने सहमती दर्शविल्यास वाहन नोंदणी प्रमाणपत्र घरपोच देणे.

परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार आरटीओचे कामकाज सुरू करण्यात येत आहे. कामकाजाची सुरुवात वाहन नोंदणीपासून होणार आहे. नागरिकांची गैरसोय होणार नाही आणि सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रकारची काळजी घेऊन काम सुरू होणार आहे.

अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Bill Gates: हे कसं घडलं? बिल गेट्स ठरले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी! – bill gates became americas biggest farmer bought 242,000 acres land

वॉशिंग्टन: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी झाले आहेत. बिल गेट्स यांनी अमेरिेकेतील १८ राज्यांमधील दोन लाख ४२ हजार एकर...

What is Honey Trap?: Explainer: हनी ट्रॅप म्हणजे काय? – what does it mean by honey trap?

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आले...

Anna Hazare: अण्णा हजारेंचं आंदोलन रोखण्यासाठी भाजपचे आटोकाट प्रयत्न; उचललं ‘हे’ पाऊल – bjp trying hard to stop anna hazare from agitation

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितल्याने त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आता भाजपने पुढचे पाऊल टाकले आहे. कोणत्याही परिस्थितीत अण्णांचे...

Anthony Stuart: गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव खेळाडू; पाहा व्हिडिओ – australian cricketer anthony stuart only bowler to take a hat trick in...

नवी दिल्ली: वनडे क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत चार असे गोलंदाज झाले आहेत ज्यांनी पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक घेतली आहे. पण करिअरमधील अखेरच्या सामन्यात हॅटट्रिक घेण्याची...

Recent Comments