Home शहरं पुणे pune news News : विधान परिषदेच्या जागांसाठी मोर्चेबांधणी - front formation for...

pune news News : विधान परिषदेच्या जागांसाठी मोर्चेबांधणी – front formation for legislative council seats


म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील विधान परिषदेच्या १२ जागांवरील नियुक्त्यांमध्ये काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या जागांमध्ये पुण्यातून वर्णी लागावी, यासाठी इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या विधान परिषदेच्या जागेसाठी यापूर्वी संधी मिळालेल्या आमदारांसह काही नवीन चेहऱ्यांकडून पाठपुरावा सुरू असल्याने पुण्यातून आमदारकीची संधी कोणाला मिळणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती लवकरच केली जाणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेला पाच, राष्ट्रवादी काँग्रेसला चार; तर काँग्रेसला तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. परंतु, विधान परिषदेच्या जागांमध्ये समसमान वाटा मिळावा, असा काँग्रेसचा आग्रह आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसला चार जागा प्राप्त झाल्यास त्यापैकी एका जागेवर पुण्यातील काँग्रेसच्या प्रतिनिधीला आमदार म्हणून संधी मिळण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून वरिष्ठ नेतृत्वाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. विधान परिषदेवर यापूर्वी प्रतिनिधीत्त्व केलेल्या मोहन जोशी आणि अनंत गाडगीळ, तसेच प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड यांची नावे इच्छुकांमध्ये आहेत. काही वर्षांपूर्वी जोशी यांना पुन्हा संधी मिळण्याची अपेक्षा असताना, ऐनवेळी विधान परिषदेची जागा काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडली होती. त्यामुळे यंदा पुन्हा आमदारकी मिळावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या सहा वर्षांमध्ये राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानाही विधान परिषदेत सातत्याने सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठविण्यात गाडगीळ यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे पुन्हा संधी मिळावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुणे महापालिकेत, संघटनेच्या स्तरावर पक्षासाठी सातत्याने कार्यरत राहणारे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यांनीही आमदार म्हणून विधान परिषदेवर संधी देण्याची इच्छा वरिष्ठ नेतृत्वाकडे व्यक्त केली आहे. यापूर्वी छाजेड यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक लढविली होती.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

new farm laws: farm laws : निवडणुकांमधून जनतेचे नवीन कृषी कायद्यांवर शिक्कामोर्तब, भाजपचा दावा – people support new farm laws in elections says prakash...

नवी दिल्लीः गुजरातमधील महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा मोठा विजय झाला आहे. नव्या कृषी कायद्यांना ( new farm laws ) शेतकरी आणि...

Recent Comments