Home शहरं पुणे pune news News : विनाकारण बंद रस्ते खुले करण्याची गरज - the...

pune news News : विनाकारण बंद रस्ते खुले करण्याची गरज – the need to open closed roads for no reason


म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या मध्य वस्तीतील नाना पेठेतील ५४ वर्षीय व्यक्तीला उपचार करण्यास नेण्यासाठी वेळेत अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेत अॅम्ब्युलन्स न मिळण्याची वेगवेगळी कारणे देण्यात येत असून, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी या प्रकरणी अॅम्ब्युलन्स सेवा पुरविणाऱ्या संस्थेकडून खुलासा मागविला आहे. या घटनेमुळे शहरात जागोजागी करण्यात आलेले ‘बॅरिकेडिंग’ही डोकेदुखी ठरत असून, मुख्य रस्तेही बंद करून गल्लीबोळांतील रस्ते चालू ठेवण्यात आले आहेत.

नाना पेठेतील ५४ वर्षीय यशूदार मोती फ्रान्सिस यांचा उपचारांअभावी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. फ्रान्सिस यांच्यापर्यंत अॅम्ब्युलन्स का पोहोचू शकली नाही, याचा खुलासा महापालिका आयुक्त गायकवाड यांनी मागवला आहे. फ्रान्सिस यांच्या कुटुंबीयांनी सरकारी हेल्पलाइन क्रमांक १०८; तसेच पोलिस नियंत्रण कक्ष १०० क्रमांकावर संपर्क साधून मदत मागितली होती. ही मदत त्यांना वेळीच न मिळाल्याने फ्रान्सिस यांचा मृत्यू झाल्याची टीका सर्वत्र होत आहे. या घटनेमुळे प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरात इतर ठिकाणी करण्यात आलेले बॅरिकेडिंग हा वादाचा मुद्दा ठरतो आहे.

लॉकडाउनच्या काळात बंदोबस्तासाठी पोलिसांकडून मुख्य रस्त्यांवर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. टिळक चौक, खंडुजीबाबा चौकात बॅरिकेडिंग करून संभाजी पुलावरील वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली आहे. त्याच वेळी त्या शेजारील भिडे पूल आणि यशवंतराव चव्हाण दुचाकी पूल वाहतुकीसाठी खुले ठेवण्यात आले आहेत. मोठे रस्ते बंद करून छोटे रस्ते खुले करण्यापाठीमागे पोलिसांनी लावलेला तर्क अनाकलनीय असल्याचा स्थानिकांचा सूर आहे. नागरिकांना घाईच्या प्रसंगी नेमका कुठला रस्ता खुला आहे, हे समजत नसल्याने मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा संपत असताना मोठे रस्ते खुले करण्याची आवश्यकता या निमित्ताने व्यक्त होत आहे.

Bमुख्य रस्ते बंद का?

Bपोलिसांना बंदोबस्तासाठी बॅरिकेडिंग करणे आवश्यक आहे. भौगौलिक क्षेत्रफळ, रस्त्यांची संख्या पाहता सर्व ठिकाणी पोलिस बंदोबस्त पुरविणे शक्य नाही. अशा प्रसंगी बॅरिकेडिंग करून वाहतूक ठरावीक ठिकाणी वळविणे आवश्यक ठरते. मात्र, अनेक ठिकाणी पोलिसांकडून मुख्य रस्ते बंद करून ही वाहतूक गल्लीबोळांत वळविण्यात आली आहे. पोलिसांचे अशा प्रकारचे नियोजन वाहनचालकांना गोंधळात टाकणारे आहे. आरोग्यविषयक आणीबाणीच्या वेळी या बॅरिकेडिंगचा फटका बसत असल्याचे गेल्या काही घटनांत दिसले आहे. त्यामुळे बॅरिकेडिंग करताना मुख्य रस्ते खुले राहतील, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Maharashtra Gram Panchayat Nivadnuk Nikal 2021: गिरीश महाजनांनी गड राखला; ४५ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा – girish mahajan win in 45 seat gram panchayat elections

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांचीच सरशी झाली आहे. तालुक्यातील ६८ पैकी तब्बल...

Tesla Motors Will Route Its India Investment Through Dutch Arm – टेस्ला भारतात; पण एलन मस्क यांनी टाकला हा मोठा डाव | Maharashtra Times

मुंबई : अमेरिकन ऑटोमोबाइल कंपनी टेस्लाने भारतात येण्यासाठी नेदरलँडचा कर सवलतीचा मार्ग शोधला आहे. टेस्ला अॅम्स्टरडॅम ही टेस्ला मोटर्स अँड एनर्जी इंडियाची मुख्य...

Sameer Khan: नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी – mumbai drug case minister nawab malik son in law sameer...

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Sameer Khan) यांना ड्रग्ज प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली...

Recent Comments