Home शहरं पुणे pune news News : शहाळ्याच्या गाडीत गांजाची तस्करी - smuggling of marijuana...

pune news News : शहाळ्याच्या गाडीत गांजाची तस्करी – smuggling of marijuana in a school bus


म. टा. प्रतिनिधी, पुणे

गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणी आणि अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून १२० किलो गांजा, दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. विशाखापट्टणम् येथून मुंबईत विक्री करण्यासाठी गांजाची वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

पोलिस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक यांना विशाखापट्टणम् येथून मुंबईला गांजाची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह, निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली महाडिक यांच्या पथकाने रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार एक स्कोडा गाडी दिसून आली. गाडी बाजूला घेऊन तपासणी केली असता गाडीत शहाळे आढळले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता शहाद्याच्या खाली गांजा आढळला. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता शहाळे वाहतूक करणाऱ्या आणखी एका चारचाकी वाहनातून गांजा पुढे गेल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी पाठलाग करून खोपोलीजवळ त्या वाहनाला पकडले. वाहनाची तपासणी केली असता शहाळ्यांच्या खाली लपवून ठेवलेला गांजा सापडला. दोन्ही वाहनांतून पोलिसांनी १२० किलो गांजा जप्त केला.लॉकडाउनच्या काळात अमली पदार्थ सापडण्याची ही पहिलीच घटना आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

vaccination in india: vaccination in india : करोना लसीकरण; ६०० जणांवर साइड इफेक्ट, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण – side effects surfacing are common...

नवी दिल्लीः देशात १६ जानेवारीला लसीकरण ( vaccination in india ) सुरू झाल्यापासून साइड इफेक्टचे ( side effects surfacing are common ) जवळपास...

जीएसटीचा नियमसंभ्रम; व्यापाऱ्यांमध्ये नाराजी

म. टा. प्रतिनिधी, मुंबई वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीसंबंधी केंद्राने एखादे परिपत्रक काढले, तरी राज्य सरकारच्या स्तरावर त्याचा अभ्यास करून त्यातील नियम बदलले...

ऑस्ट्रेलियातून आलेल्या मुंबईतील खेळाडूंना आयुक्तांनी दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला

मुंबई: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेले भारतीय खेळाडू आज गुरुवारी मायेदशात परतले. भारतीय संघातील खेलाडू त्यांच्या त्यांच्या शहरात दाखल झाले. पृथ्वी शॉ दिल्लीत, टी नटराजन...

Recent Comments