Home शहरं पुणे pune news News: शॉपिंग मॉल बंदच - shopping mall closed

pune news News: शॉपिंग मॉल बंदच – shopping mall closed


म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘करोनाचा फैलाव वाढत असल्याने शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही शहरांतील शॉपिंग मॉल बंदच ठेवण्यात येतील,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. रुग्णांची संख्या वाढत असल्याने संशयितांना क्वारंटाइन करण्यासाठी बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलासह शैक्षणिक संस्था, खासगी रुग्णालये आणि हॉटेल ताब्यात घेण्याचे आदेश त्यांनी दिले.

जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. त्या वेळी त्यांनी या सूचना केल्या. महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णांची संख्या व मृत्यू दर कमी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सील केलेल्या भागात पोलिसांनी अधिक कडक निर्बंध लावावेत. या भागात गर्दी होऊ नये, यासाठी येथील शॉपिंग मॉल कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्यात येऊ नयेत.’

‘करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी ससून रुग्णालयाच्या नवीन अकरा मजली इमारतीची उर्वरित कामे वेगाने पूर्ण करण्यात यावीत. भविष्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील इमारती व खासगी शैक्षणिक संस्थांच्या इमारतींमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील,’ असेही पवार यांनी स्पष्ट केले.

बैठकीतील निर्णय

– क्वारंटाइन सेंटर तयार करण्यासाठी खासगी हॉस्पिटल किंवा खासगी शैक्षणिक संस्थांच्या इमारती ताब्यात घेणार.

– ससून हॉस्पिटलच्या नवीन इमारतीचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त ५५ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी. येत्या दोन महिन्यांत आठव्या, नवव्या आणि दहाव्या मजल्याचे काम पूर्ण करणार.

– खासगी हॉटेलच्या सेवा अधिग्रहित; या सेवा देणे बंधनकारक; अन्यथा कारवाई.

….

शहरातील दुकाने बंदच

केंद्रीय गृहमंत्रालयाने दुकाने सुरू ठेवण्याबाबत शनिवारी आदेश काढले आहेत. मात्र, हे आदेश पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत लागू होणार नाहीत, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पुणे शहर ‘रेड झोन’मध्ये येत असल्याने शहरात संचारबंदी कायम राहणार आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jameel shaikh murder: Jameel Shaikh Murder: जमील शेख हत्या: शूटर्सना ‘त्याने’ कारमधून मालेगावात सोडले आणि… – jameel shaikh death shooters went to malegaon in...

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी शाहिद लायक शेख (३१) या आरोपीला...

Recent Comments