Home शहरं पुणे pune news News : संशयितांच्या चाचण्यावाढविण्यात याव्यात - testing of suspects should...

pune news News : संशयितांच्या चाचण्यावाढविण्यात याव्यात – testing of suspects should be stepped up


म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘करोनाच्या संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविण्यात याव्यात; तसेच करोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांकडून अवाजवी शुल्क आकारले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी,’ अशा सूचना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिल्या.

करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने याची दखल माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी घेऊन करोनाच्या सद्यस्थितीचा विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतला. त्या वेळी त्यांनी या सूचना केल्या. ‘इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यासाठी करोनाच्या संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविण्यात याव्यात, करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांकडून आवाजवी शुल्क आकारणी होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी,’ अशी सूचना पवार यांनी केली.

करोना प्रतिबंधासाठी कँन्टोन्मेंट बोर्डाला एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण आणि अमोल कोल्हे, आमदार शरद रणपिसे, चेतन तुपे, भीमराव तापकीर, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, सुनील टिंगरे, सुनील शेळके आणि सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे पालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई; तसेच सौरभ राव, विक्रम कुमार, अनिल कवडे, सचिंद्र प्रताप सिंग, कौस्तुभ दिवेगावकर, रुबल अग्रवाल, संदीप पाटील, आयुष प्रसाद, डॉ. अनुप कुमार यादव, डॉ. सुभाष साळुंखे, डॉ. अर्चना पाटील, डॉ. मुरलीधर आदी वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

महापौरांचे कौतुक आणि अधिकाऱ्यांची कानउघाडणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत शरद पवार यांच्यासमोर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कामाचे कौतुक केले. पुणे महापालिकेने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आर्थिक भार सहन केला असल्याने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र, अधिकाऱ्यांची त्यांनी कानउघाडणी केली. ‘मी दररोज अधिकाऱ्यांना फोन करून करोनाचा आढावा घेतो. त्याप्रमाणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनीही खासदार आणि आमदार या लोकप्रतिनिधींना फोन करून माहिती दिली पाहिजे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन काम केले पाहिजे. अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेल्या जबाबदारीप्रमाणे काम करावे,’ असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सुनावले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

aurangabad News : अनुकंपा तत्त्वावर मिळाली पालिकेत ३९ जणांना नोकरी – 39 people got jobs in the municipality on compassionate basis

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद'लॉकडाऊन'च्या काळात महापालिकेच्या आस्थापना विभागाने ३९ जणांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिली आहे. त्यामुळे अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचा अनुशेष भरून निघाल्याचे मानले...

ibps clerk recruitment 2020: सरकारी बँकेत क्लर्क पदावर मोठी भरती; हजारो पदे रिक्त – ibps clerk recruitment 2020 ibps issued notification for clerk jobs

IBPS Clerk Recruitment 2020: सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. तुमच्यासाठी सरकारी नोकरी मिळवण्याची संधी आहे.पदाचे नाव - क्लर्क पदांची...

Delhi Police: महिलेनं मैत्री करण्यास नकार दिला म्हणून असा घेतला सूड… – delhi police arrested 2 they made victim fake facebook profile and put...

नवी दिल्ली : महिलेनं मैत्री करण्यास नकार दिला म्हणून एका विकृत व्यक्तीनं तिचा सूड घेण्यासाठी अजब मार्ग निवडला. या व्यक्तीनं महिलेचा मोबाईल क्रमांक...

Recent Comments