Home शहरं पुणे pune news News : संसर्गित : ३४०करोनामुक्त : २२९ - infected: 340...

pune news News : संसर्गित : ३४०करोनामुक्त : २२९ – infected: 340 karonamukta: 229


शहरात दिवसभरात आठ जणांचा मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागांत मिळून बुधवारी करोनामुळे आठ जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील दोघे मुंबई आणि बीड जिल्ह्यातील रुग्ण आहेत. दिवसभरात शहरात ३४० जणांना संसर्ग झाला असून, बरे झालेल्या २२९ जणांना घरी सोडण्यात आले. शहरातील रुग्णालयांमध्ये सध्या १६५ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

बुधवारी पुणे शहरात २८८ जणांना, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ३० रुग्णांना करोनाची लागण झाली, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १२ आणि पुणे कँटोन्मेंट परिसरात नवे १० रुग्ण सापडले. खेड, जुन्नर, आंबेगाव, मुळशी, हवेली, शिरूर या तालुक्यांत रुग्ण वाढले आहेत. कँटोन्मेंट बोर्डांच्या हद्दीत पुणे कँटोन्मेंटमध्ये सहा, तर खडकीमध्ये चार रुग्ण आढळले आहेत.

शहरात बुधवारी २२९ रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. बरे झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आतापर्यंत शहरातील रुग्णालयांतून ४३३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांची संख्याही वाढली असून, बुधवारी १२४९ जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यामुळे आतापर्यंत शहरात घेतल्या गेलेल्या एकूण चाचण्यांची संख्या ५३ हजार ७०९ झाली आहे. मात्र, गंभीर रुग्णांची संख्या अद्याप घटली नसल्याने चिंता कायम आहे. बुधवारी १६५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यापैकी ४३ जण व्हेंटिलेटरवर आहेत. शहरातील रुग्णालयांमध्ये सध्या २३८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, बुधवारी शहरात करोनामुळे आठ जणांचा मृत्यू झाला. त्यात सहा महिलांसह एका १५ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. मृत मुलगा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील असून, पुण्यात एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आला होता. त्याला मूत्रपिंडाचा दुर्धर आजार होता. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा बुधवारी दुपारी पावणेतीन वाजता मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेली महिला मुंबईतील कांदिवली येथील रहिवासी असून, त्या ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिक होत्या. त्यांचा मृत्यू खासगी रुग्णालयात झाला. याशिवाय गंज पेठ, खडकी, मंगळवार पेठ, पर्वती, येरवडा, कल्याणीनगर येथील रुग्णांचा मृतांमध्ये समावेश आहे.

बुधवारची स्थिती

एकूण रुग्ण – ३४०

पुणे पालिका नवीन रुग्ण – २८८

पिंपरी चिंचवड नवीन रुग्ण – ३०

पुणे कॅन्टोन्मेंट नवीन रुग्ण – १०

पुणे ग्रामीण नवीन रुग्ण – १२

बुधवारी बरे झालेले रुग्ण – २२९

बुधवारचे मृत्यू – ८

पॉझिटिव्ह एकूण ८४७४ (शहर ७१४५, पिंपरी चिंचवड ५८७, पुणे ग्रामीण ३१३ + पुणे कँटोन्मेंट, जिल्हा रुग्णालय ४२९)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments