Home शहरं पुणे pune news News : ससूनला अखेर ‘प्लाझ्मा थेरपी’ची परवानगी - sassoon finally...

pune news News : ससूनला अखेर ‘प्लाझ्मा थेरपी’ची परवानगी – sassoon finally gets permission for plasma therapy


दात्याच्या रक्ताची चाचणी सुरू

म. टा. प्रतिनिधी, पुणे

करोनाबाधितांना जीवदान देण्यासाठी ससून रुग्णालयात आता नव्याने ‘प्लाझ्मा थेरपी’च्या उपचारचा प्रयोग करण्याची परवानगी अखेर ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्च’ने (आयसीएमआर) शनिवारी रात्रीच्या साडेनऊच्या सुमारास दिली. त्यामुळे आता बरे झालेल्या बाधितांचे रक्त घेऊन त्याद्वारे प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करण्याचा ससून रुग्णालयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

करोनाबाधितांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचे उपचार उपयोगी ठरतील का, हे सिद्ध करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करण्यात येणार आहे. रुग्णालय प्रशासनाने या संदर्भात आय़सीएमआरला प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावासाठी पुण्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए); तसेच केंद्रीय औषध महानियंत्रकांनीदेखील रक्तातील प्लाझ्माचे घटक वेगळे करण्यासाठी (प्लाझ्मा फोरेसिस) परवानगी दिली होती. त्या घटनेला आता एक आठवडा झाला. तेव्हापासून ससून रुग्णालय प्रशासन ‘आय़सीएमआर’च्या परवानगीची वाट पाहत होते. अखेर ती परवानगी ससून रुग्णालयास मिळाली. त्यामुळे चाचणी आणि प्रयोग करणे शक्य होणार असल्याचे स्पष्ट झाले.

‘ससून रुग्णालयास ‘आयसीएमआर’कडून प्लाझ्मा थेरपी करण्याची परवानगी शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मिळाली. त्यामुळे आता प्लाझ्मा थेरपीवरील संशोधन सुरू करणे शक्य होईल. परंतु, ज्या रुग्णांना प्लाझ्माचे घटक द्यायचे आहेत, त्या रुग्णांचा विमा उतरवावा लागतो. ती प्रक्रिया ‘आयसीएमआर’कडून केली जात असून ती पूर्ण होईल. दरम्यान, ससून रुग्णालयाने एका दात्याचे रक्त घेतले असून त्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविले आहेत. त्या दात्याच्या रक्तामध्ये करोनाच्या विषाणूविरोधात लढण्यासाठी किती अन्टिबॉडीज आहेत याची चाचपणी त्या चाचणीमधून स्पष्ट होणार आहे. दात्याच्या रक्तामध्ये संशोधनासाठी; तसेच रुग्णावर परिणामकारक असे पुरेसे अन्टिबॉडीज असल्यास त्या दात्याचे रक्त काढून प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करता येईल. त्या चाचणीचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. आता प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग लवकर सुरू होईल. प्रामुख्याने अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णाला प्राधान्याने प्लाझ्मा थेरपी दिली जाईल,’ अशी माहिती ससून रुग्णालयातील सूत्रांनी ‘मटा’ला दिली. दरम्यान, मुंबईत एका खासगी रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीचा नुकताच प्रयोग करण्यात आला. त्यात ज्या रुग्णाला प्लाझ्मा देण्यात आले. त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे या थेरपीबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे ससूनला यात यश येईल का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

26/11 Mumbai Attack in Marathi: Mumbai 26/11 attack २६/११ हल्ला: ‘या’ देशात उभारले जाणार स्मारक – Mumbai Terror Attack Israelis Planning Memorial For Victims...

तेल अवीव: मुंबईत २००८ मध्ये झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात भारतासह इतर देशांतील नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये...

Mumbai High Court Rejects Plea Of CBI Probe Into Disha Salian’s Death – दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे द्यावा; मुंबई हायकोर्टाने दिले ‘हे’ उत्तर

मुंबईः बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या आत्महत्येची फाइल मुंबई पोलिसांनी बंद केल्यानंतर दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा...

Corona Cases in Aurangabad: एका रुग्णाचा मृत्यू; १११ नवे बाधित – aurangabad reported 111 new corona cases and 1 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील पाथरी येथील ७० वर्षांच्या बाधित महिला रुग्णाचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना बळींची संख्या...

Maradona Goals Every Football Fans Should Watch His Skills And Abilities – Maradona Goals Video: प्रत्येक चाहत्याने पाहिले पाहिजेत मॅराडोनाच्या सर्वोत्तम गोलचे व्हिडिओ

नवी दिल्ली: फुटबॉल जगातील महान खेळाडू दिएगो मॅराडोना (Diego Maradona) यांचे बुधवारी निधन झाले. फुटबॉल जगतातील सर्व चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या मॅराडोनाच्या निधनामुळे...

Recent Comments