Home शहरं पुणे pune news News: ससून रुग्णालयाच्या नर्सचा मृत्यू - death of sassoon hospital...

pune news News: ससून रुग्णालयाच्या नर्सचा मृत्यू – death of sassoon hospital nurse


म. टा. प्रतिनिधी, पुणे

ससून रुग्णालयातील सहायक अधिपरिचरिका (असिस्टंट मेट्रन) अनिता राठोड यांचा ससून रुग्णालयात मेंदूत रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. या प्रकरणी करोनाच्या रुग्णांच्या सेवेचा अतिरिक्त ताण पडल्याचा आरोप ससूनच्या नर्सेस संघटनेने केला आहे.

ससून रुग्णालयाच्या नवीन अकरा मजली इमारतीत करोनाच्या रुग्णांचा वॉर्ड आहे. तेथे सुमारे दोनशेहून अधिक नर्सेस कार्यरत आहेत. त्याच पथकात राठोड काम करीत होत्या. त्या दररोज सकाळी साडेसात ते रात्री ११ वाजेपर्यंत कामावर थांबत होत्या. कामाच्या ताणामुळे गेल्या रविवारी रात्री ११ वाजता घरी गेल्यावर त्यांचे डोके दुखत होते. त्यानंतर त्यांना रात्रभर ऊलट्या झाल्या. दुसऱ्या दिवशी त्यांची ससून रुग्णालयात तपासणी केली असता त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याचे निदान झाले.

आजाराचे निदान झाल्यावर २१ एप्रिलला ‘क्रेनियाटामी’ ही शस्त्रक्रिया झाली; पण त्यांच्या शरीराने औषधोपचारांना प्रतिसाद दिला नाही. अखेर शुक्रवारी दुपारी त्यांचे निधन झाले, अशी माहिती महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्ष सुमन टिळेकर यांनी दिली.

दरम्यान, शनिवारी सकाळी १० वाजता राठोड यांना ससूनच्या नर्सेस संघटनेकडून सुरक्षित वावर ठेवून श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय पथकाने त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पोलिस आयुक्तालयात बोलावण्यात आले होते. या वेळी तेथे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते. नर्सेसच्या सुरक्षिततेसाठी पीपीई किट देण्यात यावेत. त्यांना हॉटेलमध्ये सर्व सुविधा मिळाव्यात; तसेच रुग्णसेवेनंतर सहा दिवस विलगीकरण करून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर त्यांना घरी सोडण्यात यावेत, अशा मागण्या टिळेकर यांनी केल्या. त्या वेळी विभागीय आयुक्तांनी त्यांना मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

रुग्णालयातील कामाचा ताण वाढल्याने राठोड यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील नर्सेसना बारा तांसाची ड्युटी कमी करून ती सहा तासांची करण्यात यावी.

सुमन टिळेकर, अध्यक्ष, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mamata Banerjee: ‘असा गृहमंत्री आपण यापूर्वी कधीच पाहिला नाही’ – mamata banerjee alleges pm modi amit shah and bjp farmers protest coronavirus issue

कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक ( west bengal election ) जवळ येताच राजकारणाचा पारा चढत चालला आहे. मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता...

virat kohli: रोहित शर्माच्या दुखापतीबाबत कर्णधार विराट कोहलीने सोडले मौन, म्हणाला… – indian captain virat kohli opens up on lack of clarity, confusion over...

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्यापासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. पण ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरु होण्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्माच्या...

Sandeep Kulkarni Shares View On Technology And World – एखाद्या गोष्टीची जाणीव होत नाही, तोवर त्याची किंमत कळत नाही- संदीप कुलकर्णी

संदीप कुलकर्णीपहिलं आणि दुसरं महायुद्ध झालं, तेव्हा आपला जन्मही झाला नव्हता. त्या काळात जगातल्या काही देशांना या महायुद्धांची चांगलीच धग लागली. पण, करोनाच्या...

Recent Comments