Home शहरं पुणे pune news News : सांस्कृतिक कार्यक्रम ठप्प; कलाकारांसमोर - cultural events stalled;...

pune news News : सांस्कृतिक कार्यक्रम ठप्प; कलाकारांसमोर – cultural events stalled; in front of the artists


म. टा. प्रतिनिधी, पुणेराज्याची सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात गेल्या दोन महिन्यांत एकही कार्यक्रम झालेला नाही. त्यामुळे उदयोन्मुख नृत्य कलाकार, गायक, वादक, साथसंगत करणारे कलाकार; तसेच प्रकाशयोजना व ध्वनिसंयोजन करणारे पडद्यामागील कलाकार यांच्यापुढे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. सभागृहांमध्ये मैफलींचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांनी येण्याची परंपरा सुरू व्हायला आणखी काही महिने लागणार असल्याने या कलेवरच आर्थिक उत्पन्न असलेल्या कलाकारांची मोठी गैरसोय झाली आहे. पुण्यामध्ये करोना विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण ९ मार्च सापडल्यानंतर १४ मार्चपासून नाट्य सभागृहे बंद करण्यात आली. तेव्हापासून शहरात सांस्कृतिक कार्यक्रम झालेला नाही. शहरांतील विविध भागांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात येत असले, तरी सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा सुरू होण्याची शक्यता धुसर आहे. सुरक्षित वावर राखण्याच्या नियमांचे पालन करून, तोंडाला मास्क लावून सुरक्षितरीत्या सांस्कृतिक कार्यक्रम होतील का, हे तूर्तास सांगता येत नसल्याने कलाकारांसमोर भीषण प्रश्न उभा ठाकला आहे. पुण्यातील प्रख्यात कलाकारांनी ‘मटा’शी संवाद साधताना उदयोन्मुख कलाकारांच्या समस्येवर बोट ठेवले. ‘कार्यक्रम, रेकॉर्डिंग, शिकवणी असे सर्व स्रोत बंद झाल्याने शास्त्रीय नृत्य सादर करणारे, साथसंगत करणारे, सहकलाकार यांचे उत्पन्न थांबले आहे. केवळ कलेवरील उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्या कलाकारांपुढे सहा ते आठ महिने किंवा आगामी वर्ष कसे काढायचे, हा प्रश्न आहे. पुण्यात नृत्याच्या ८०; तसेच संगीताच्याही अनेक संस्था आहेत. महिन्याला तीन-चार कार्यक्रमांतून मिळणारे उत्पन्न थांबल्याने कलाकार आणि त्यांचे कुटुंबीय अडचणीत आहेत,’ याकडे ज्येष्ठ नृत्य गुरू शमा भाटे यांनी लक्ष वेधले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

gupta and verma sent to ed custody: ED Raids on Omkar Group झोपडपट्टी पुनर्वसन घोटाळा; ओमकार समूहाचे गुप्ता आणि वर्मा यांना ‘ईडी’ची कोठडी –...

हायलाइट्स:'ओमकार रियल्टर्स' या कंपनीत २२ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा संशय 'ईडी'ने सोमवारी ओमकार रियल्टर्सच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. ओमकार समूहाचे अध्यक्ष...

sonography centre in aurangabad: सोनोग्राफी केंद्रांवर आता जिल्हाप्रशासनाची नजर – nashik district administration will watch on sonography centre

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादसोनोग्राफी केंद्रामध्ये तीन ते चार महिने गर्भवती असलेली महिला अचानक तपासणीस येणे बंद कसे होते, याबाबत लक्ष देण्यात येणार आहे....

Recent Comments