Home शहरं पुणे pune news News: साहिलने मुखाग्नी देऊन हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन - sahil pays...

pune news News: साहिलने मुखाग्नी देऊन हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन – sahil pays homage to hindu-muslim unity


Harsh.Dudhe@timesgroup.com

@HarshDudheMT

पुणे : करोनाच्या फैलावामुळे पसरलेले भीतीचे वातावरण आणि समाजमाध्यमातील संदेशांमुळे धार्मिक तेढ अशा वातावरणात जेजुरी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) मुस्लिम विद्यार्थ्याने हिंदू व्यक्तीच्या पार्थिवाला मुखाग्नी देऊन सलोख्याचा आदर्श समोर ठेवला.

साहिल मुंडे असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या शरदचंद्रजी पवार महाविद्यालयात बीकॉम अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षांत शिकत आहे. एनएसएसच्या करोना विरोधातील लढाईत साहिल सहभागी झाला असून, घरीच मास्क आणि सॅनिटायझर तयार करण्याचे काम करीत आहे. याशिवाय मदतीसाठी त्याने दहा कुटुंबे दत्तक घेतली आहेत. जुने जेजुरी येथील ज्येष्ठ नागरिक शिवाजी बाबर यांचे शुक्रवारी २४ एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास वाजता निधन झाले. त्यांच्या मुलाचे गेल्या वर्षी निधन झाले. या घटनेनंतर त्याची पत्नी आणि मुले गावाला निघून गेले. त्यामुळे घरी शिवाजी बाबर आणि त्यांच्या पत्नी राहत होत्या. बाबर यांची मुलगी ही फलटणला राहते. हे वयोवृद्ध दाम्पत्य आपले आयुष्य जगत होते.

करोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागू आहे. अशा परिस्थितीत बाबर यांची मुलगी; तसेच जवळचे नातेवाइक अंत्यविधीला येऊ शकले नाहीत. अशा परिस्थितीत अंत्यसंस्कार करणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला. त्या वेळी साहिलने पुढाकार घेऊन बाबर यांना मुखाग्नी देऊन अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडली, आणि मानवता धर्माचे दर्शन घडविले. यात त्याला श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी सहकार्य केले. साहिलच्या या कार्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी कौतुक केले आहे.

.

बाबर काकांचा मुलगा संतोष आणि मी मित्र होतो. घराशेजारी त्यांचे घर असल्याने लहानपणापासून त्यांच्या घरी जाणे-येणे होते. अनेकदा त्यांच्या घरी जेवलो आहे. मित्राचे निधन गेल्या वर्षी झाले. आजारपणामुळे काकांचे निधन शुक्रवारी झाले. त्यामुळे माझे कर्तव्य म्हणून मी एका मुलाप्रमाणे अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडली.

– साहिल मुंडे, स्वयंसेवक व विद्यार्थी, शरदचंद्रजी पवार महाविद्यालय

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ranjitsinh disale: वैश्विक शिक्षक : रणजितसिंह डिसले – india’s zp school teacher ranjitsinh disale wins 2020 global teacher prize

‘युनेस्को’ आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या ‘ग्लोबल टीचर’ या सन्मानासह सुमारे सात कोटी रुपयांचे पारितोषिक मिळविणारे रणजितसिंह डिसले हे खऱ्या अर्थाने वैश्विक शिक्षक...

आजचं राशीभविष्य… दिनांक ०५ डिसेंबर २०२०

आजचं राशीभविष्य... दिनांक ०५ डिसेंबर २०२० Source link

Recent Comments