Home शहरं पुणे pune news News: स्थिर अन् पॉझिटिव्ह रुग्णांचे स्थलांतर - migration of stable...

pune news News: स्थिर अन् पॉझिटिव्ह रुग्णांचे स्थलांतर – migration of stable unpositive patients


पालिकेच्या आयसोलेशन वॉर्डात हलवले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ससून रुग्णालयात पॉझिटिव्ह असलेल्या बहुतांश रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कोणतेही अन्य आजार नाहीत. अशा रुग्णांचे ससून रुग्णालय प्रशासनाने महापालिकेच्या आयसोलेशन वॉर्डात स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी २५ रुग्णांना सणस मैदानावरील आयसोलेशन वॉर्डमध्ये पाठवण्यात आले.

सध्या पुण्यात ससून रुग्णालय, नायडू रुग्णालयात असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ही सर्वांसाठी डोकेदुखी ठरणारी बाब असली, तरी विशेषतः आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेची बाब ठरली आहे. सध्या रुग्णसंख्या वाढत असल्याने ससून रुग्णालयातील अकरा मजली इमारतीत असलेले आयसोलेशन वॉर्ड फुल्ल झाले आहे. तसेच अतिदक्षता विभागही (आयसीयू) भरला आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या रुग्णांची व्यवस्था कुठे करायची असा प्रश्न ससून रुग्णालय प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे.

ससून रुग्णालयाच्या अकरा मजली इमारतीत पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. रुग्णांपैकी ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत, तरीही ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. तसेच त्यांना रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा यापैकी कोणताही अन्य आजार नाही, अशा प्रकृती स्थिर असलेल्या रुग्णांना ससून रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात ठेवण्याऐवजी दुसरीकडे हलविण्याचे काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. अखेर शुक्रवारी सायंकाळी रुग्णालयातील सुमारे २५ रुग्णांचे स्थलांतर करण्यात आले. या संदर्भात महापालिकेचा आरोग्य विभाग आणि ससून रुग्णालय प्रशासन यांची याबाबत चर्चा होऊन त्याबाबत निर्णय़ झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

ससून रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, ‘सध्या रुग्णालयातील बेड्सची क्षमता संपली आहे. त्यामुळे प्रकृती स्थिर असलेल्या रुग्णांना आयसोलेशन वॉर्डात स्थलांतरीत करीत आहोत. तसेच खासगी रुग्णालयांना देखील संपर्क करून अन्य रुग्ण घेण्याची विनंती करीत आहोत.’

ससून रुग्णालयावरील ताण वाढला आहे. तेथील ताण कमी करण्यासाठी प्रशासनाकडून महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी चर्चा झाली. त्या चर्चेनुसार स्थिर प्रकृती असलेल्या रुग्णांना महापालिकेच्या आयसोलेशन वॉर्डात स्थलांतर करण्यात येत आहे,, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

hyderabad municipal elections 2020: शिवसेनेला अॅलर्ट? हैदराबाद महापालिका निडणुकीसाठी भाजपची फौज, PM मोदीही प्रचारात उतरणार! – amit shah jp nadda to campaign for hyderabad...

हैदराबाद: हैदराबादमध्ये ( hyderabad election ) यावेळी काहीतरी 'अनपेक्षित' पाहायला मिळू शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( pm modi ), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...

aurangabad News : दुसऱ्या लाटेस थोपविण्यास प्रशासन सज्ज – the administration is ready to block the second wave

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेचे प्रशासन सज्ज आहे. आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध आहे....

Nashik News : उपसभापती सुनील पाटील अपात्र – deputy speaker sunil patil ineligible

म. टा. वृत्तसेवा, चाळीसगावपंचायत समिती सभापती निवडीप्रसंगी बंड करीत राष्ट्रवादी काँग्रेसला जावून मिळालेले भाजपचे करगाव गणाचे पंचायत समिती सदस्य तथा उपसभापती सुनील साहेबराव...

Recent Comments