Home शहरं पुणे pune news News : स्वप्नांना पंख नवे! - new wings to dreams!

pune news News : स्वप्नांना पंख नवे! – new wings to dreams!


लॉकडाउनमध्ये अनेकांच्या व्यवसायाचे नुकसान झाले, अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या, विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले… अनेक नकारात्मक घटना एका पाठोपाठ एक घडत गेल्या. मात्र, यानंतरही पुणेकर खचलेले नाहीत. अचानक ओढवलेले हे संकट आता समर्थपणे झेलून पुन्हा नव्या उमेदीने उभे राहू, असा त्यांना विश्वास आहे. स्वप्नांना नवे पंख लावून जिद्दीने उभे राहण्याचा ध्यास घेतलेल्यांची ही मनोगते…

आमचा इंडस्ट्रियल लाँड्रीचा व्यवसाय आहे. मी आणि माझा मित्र तो व्यवसाय चालवत होतो. बहुतांश हॉटेल, लॉज, केटरर यांचे कपडे आम्ही धुवून देत होतो. लॉकडाउन सुरू झाले आणि व्यवसाय ठप्पच झाला. दोन महिने करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला होता; पण लॉकडाउनचा हा काळ विचार करण्यासाठी सत्कारणी लावला आणि आता व्यवसाय अधिक वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात अनेक हॉटेल आणि केटररशी संपर्क साधून आम्ही आमच्या कामाची माहिती दिली. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर अनेक हॉटेल व्यावसायिकांनी आम्हाला काम दिले असून, व्यवसाय वाढविण्याचा घेतलेला निर्णय योग्य ठरला आहे. काही महिन्यांच्या कालावधीने का होईना; पण लॉकडाउनमध्ये झालेले नुकसान भरून निघेल, याचा विश्वास वाटतो.

– शशांक कुलकर्णी, व्यवसायिक

नोकरकपातीच्या संकटाला मलाही सामोरे जावे लागले; पण घाबरून गेले नाही. त्या ऐवजी परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. सध्या एका मित्राच्या व्यवसायात त्याला मदत करणार आहे. त्यातून नव्या संधी शोधण्याचा प्रयत्न आहे. नोकरीतील चाकोरीबद्ध जीवन जगण्यापेक्षा आता व्यवसाय करण्यावर अधिक भर राहील. हे लॉकडाउन अनेक सकारात्मक गोष्टी शिकवून गेले आहे. त्या गोष्टींचा वापर करून नवी सुरुवात करायची आहे. अडथळे आले, तरी न डगमगता त्यांच्यावर मात करेन, असा आत्मविश्वास आहे.

– श्वेता वाजपेयी, नवव्यावसायिक

लॉकडाउनने काय शिकवले असेल, तर कोणत्याही गोष्टीची बचत. बचत करून घर सांभाळण्यासाठीचे नियोजन आता मी केले आहे. प्रत्येक गोष्टीचा हिशेब ठेवून घरातील वापराची कोणतीही वस्तू वाया जाणार नाही, याची काळजी घेणार आहे. माझ्यासाठी ही नवी सुरुवात आहे. माणसाच्या आयुष्यात दिनक्रम किती महत्त्वाचा आहे, हेही लॉकडाउनने शिकवले आहे. कुटुंबातील सदस्यांचा दिनक्रम निश्चित करण्यावर भर असून, जगण्यातील ही शिस्त पुढचे आयुष्य अधिक सुकर करेल, अशी आशा आहे. दीर्घ काळ लांबलेल्या लॉकडाउननंतर आता पुन्हा कुटुंबीयांची कामे सुरू झाली आहेत. नवी सुरुवात करून अधिक चांगले आयुष्य कसे जगता येईल, यावर आम्ही भर देत आहोत.

– रूपाली फडणीस, गृहिणी

हॉटेल व्यवसायाचे प्रचंड नुकसान झाले आहे; पण येत्या काळात ते भरून काढण्यासाठी चालकांना वेगवेगळ्या संकल्पना राबवाव्या लागतील. त्याचे नियोजन सुरू असून ग्राहकांना पुन्हा हॉटेलांकडे कसे वळवता येईल, याबाबत विचार सुरू आहे. नुकसान झाल्यावर रडत बसणे हा मराठी माणसाचा स्वभाव नाही. त्यामुळे नवी इनिंग अधिक मेहनतीने करावी लागणार आहे. मागचे सगळे विसरून पुन्हा एकदा व्यवसाय बांधण्यावर लक्ष केंद्रित केले आहे

– शुभम अनारसे, हॉटेल व्यावसायिक

पुढच्या काळात करोनासारखे अनेक विषाणू येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी कायम आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मी स्वतः ती घेईन आणि इतरांनीही ती घ्यावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. आरोग्य किती महत्त्वाचे आहे, हे एव्हाना लक्षात आले आहे. त्या दृष्टीने जनजागृतीचे प्रयत्न करण्याचा मानस आहे. कामाबाबत सांगायचे, तर बंद झालेले काम पुन्हा सुरू करतो आहे. नव्या संधीच्या शोधात आहे.

– ऋतुराज सफई,Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Samsung smartphones: सॅमसंगचे हे प्रोडक्ट्स सर्वात स्वस्त खरेदीची संधी, सेलमध्ये या ऑफर्स – samsung smartphones, galaxy watch and tablets on discounted price on amazon...

नवी दिल्लीः सॅमसंगचे नवीन स्मार्टफो खरेदी करायचा असेल किंवा नवीन व्हियरेबल, सर्वात स्वस्त खरेदीच करण्याची संधी आहे. ई-कॉमर्स अॅमेझॉनवर सुरू असलेल्या कंपनीच्या फ्लॅगशीप,...

Aurangabad Municipal Corporation: शहरासाठी आठवड्यातून दोन चांगल्या गोष्टी करा! – Aurangabad municipal corporation will has started love Aurangabad campaign under Aurangabad smart city devlopment...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादऔरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून महापालिका शहरात 'लव्ह औरंगाबाद' अभियान सुरू करणार आहे. या अभियानात सहभागी होताना प्रत्येक नागरिकाने...

Recent Comments